Join us

Farmer Success Story : दहा शेतकऱ्यांनी सुरू केली कंपनी; उलाढाल ४० लाखांवर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:17 IST

Farmer Success Story : शेतकऱ्यांची मेहनत व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळे सुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीची भरभराट सुरू आहे.

- गोपाल लाजूरकर 

गडचिरोली : सुरुवातीला १० जणांनी सुरु केलेल्या या कंपनीत आता ४०० हून अधिक सभासद शेतकरी आहेत. सर्व सभासदांची मेहनत व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांचे मार्गदर्शन यामुळे कंपनीची वार्षिक उलाढाल ४० लाखांच्या वर गेलेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) दुर्गम व ग्रामीण भागातील मुलचेरा येथे १० शेतकऱ्यांनी सुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीची (Subhgon FPO)  ३१ मे २०१९ रोजी स्थापना केली. या कंपनीने आतापर्यंत नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरु केलेत. तसेच अनोखे प्रयोग केलेत. शेतकऱ्यांची मेहनत व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळे सुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीची भरभराट सुरू आहे.

मुलचेरा येथील शेतकऱ्यांनी कंपनीची स्थापना करताना कुठल्याही प्रकारचा शासकीय लाभ घेतला नाही. सध्या कंपनीची शेतकरी सभासदसंख्या ४०० आहे. येथे एकूण ६ संचालक आहेत. त्यापैकी एक महिला संचालक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी तांदूळ, डाळ, बेसन, हळद व जवस तेल, सेंद्रिय शेतीकरिता (Organic Farming) लागणाऱ्या निविष्ठा आदींची विक्री केलर जास्त आहे. 

पहिल्या वर्षी २०१९-२० रोजी ५.१२ लाख उलाढाल होती. दरवर्षी ही उलाढाल वाढत गेली. २०२३-२४ या वर्षात ही उलाढाल वाढतच गेली. आता विविध स्त्रोतांच्या माध्यमातून ४० लाखांवर उलाढाल पोहोचलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीला 'आत्मा'चे माजी प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, मुलचेराचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, तसेच सध्याच्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

ट्रायकोकार्ड निर्मिती युनिट शेतकऱ्यांनी गडचिरोलीच्या तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तथा सध्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात कंपनीने मित्र कीटक ट्रायकोग्रामाचे संगोपन करून प्रतिवर्ष ४०००-ते ५००० ट्रायकोकार्ड निर्मिती करणारे केंद्र उभारले.

सेंद्रिय निविष्ठा निर्मिती शेतकरी कंपनीचे बहुतेक सदस्य सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करून विषमुक्त शेतीकडे वळत आहेत. शेतात गिरिपुष्प, गराडी, थेंचा आदी हिरवळीच्या खतांचा वापर करीत आहेत. कीड नियंत्रण करण्यासाठी वापरले जाणारे पिवळे, निळे चिकट सापळे निर्मिती करून शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत.

गोदाम बांधले, आता सेंद्रिय शेतीतून विविध उत्पादनांचे बॅण्ड केले तयार शेतकरी उत्पादक कंपनीकडे ३०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. सदर गोदाम तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मंजूर झाले. नुकतेच कंपनीने डॉ. पं. दे. नै.शे. मिशन अंतर्गत सहभाग घेऊन आत्माचे प्रकल्प संचालक आबासाहेब धापते यांच्या मार्गदर्शनात बांधावरील प्रयोगशाळा, नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्र उभे केले आहे. कंपनीकडून सेंद्रिय उत्पादनांचे बॅण्ड तयार केले जात आहे.

कीर्तन गाजविणाऱ्या कृष्णा महाराजांनी पपई शेतीतून पाऊण एकरात केली अडीच लाखांची अर्थप्राप्ती

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरीगडचिरोली