Join us

खारतोडे बंधूच्या आंबट, गोड चवीच्या चेकनेट बोरांनी केलं ग्राहकांना चेकमेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:20 PM

बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील खडकाळ माळरान जमिनीत येथील खारतोडे बंधूनी वीस गुंठे क्षेत्रात चेकनेट बोरांची यशस्वी लागवड करून संगोपन केले आहे. या बोराच्या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

सतीश सांगळेरंगाने हिरवट, चवीला गोड असणाऱ्या चेकनेट बोरांची सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आतक सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील ग्राहकांना या बोरांची भुरळ पडली आहे. लहान आकार असल्याने आणि रंगाने हिरवे असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत, बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील खडकाळ माळरान जमिनीत येथील खारतोडे बंधूनी वीस गुंठे क्षेत्रात चेकनेट बोरांची यशस्वी लागवड करून संगोपन केले आहे.

या बोराच्या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. विरंगुडी येथील सुखदेव खारतोडे व सचिन खारतोडे यांनी जून २०२२ मध्ये त्यांनी १८ फूट बाय १५ फूट अशा अंतरानुसार ८० रोपांची लागवड केली. फळझाडांचे संगोपन करताना औषधांची वेळेवर फवारणी केली, जमिनीचा पोत टिकून राहावा म्हणून रासायनिक खताऐवजी सेंद्रिय पद्धतीच्या खताला त्यांनी प्राधान्य दिले. मावा, तुडतुडे व कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फळझाडांची विशेष काळजी त्यांनी घेतली.

आवश्यकतेनुसारच त्यांनी ठिबक व पाट पाण्याचे नियोजन केले, वातावरणातील बदलांवरही त्यांनी सतत लक्ष ठेवले. या साऱ्याचे फलित म्हणून गेली तीन वर्षे त्यांच्या बागेतील हे प्रत्येक झाड चविष्ट बोरांनी लगडलेले आहे. त्यांच्या वीस गुंठे क्षेत्रात ऐंशी झाडे आहेत. यामधून हंगामात ५ पाच टन उत्पादन मिळाले आहे सरासरी ५० रुपये दर मिळाला यामधून तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.

स्थानिक बाजारपेठ बारामती पूणे येथे विक्री केली. चेकनेट देशी बोरे आकाराने लहान असली तरी त्यांची चव दीर्घकाळ रेंगाळत राहते, या बोरांचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो, संक्रांतीच्या काळात मागणी वाढत जाते. फेब्रुवारीअखेर बोरांच्या हंगामाची सांगता होते. पाळ लागणीच्या काळातील ढगाळ वातावरण, तापमानातील चढउतार यामुळे बोरांचे उत्पादन चांगले मिळाले आहे. बोराची चव आणि देखणा आकार व्यापारी, ग्राहकांना भुरळ घालत आहे.

देशी बोरांची नागरिकांना भुरळदेशी बोरे आकाराने लहान असली तरी त्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते. त्याची भुरळ पडणार नाही अशी व्यक्तीच दुर्मिळ बोरांचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यांत तुरळक आवक सुरू होते. पुढे टप्याटप्याने डिसेंबरमध्ये हंगाम जोमात येतो. संक्रांतीच्या सणासाठी बोरांना भागणी वाढत असल्याने दरही साधारण दुपटीने वाढतात. संक्रांतीनंतर हगाम कमी होत फेब्रुवारी अखेर बोरांच्या हंगामाची सांगता होते.

अधिक वाचा: कुसळ उगवणाऱ्या जागी डाळिंबाच्या बागा; छपराच्या झाल्या माड्या अन् त्यापुढं उभ्या अलिशान गाड्या

टॅग्स :शेतकरीशेतीफलोत्पादनफळेइंदापूर