Join us

आदिवासी शेतकऱ्याची कमाल, भातशेतीला फाटा देत फुलवली सूर्यफुलाची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 3:42 PM

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे.

पालघर आदिवासीबहुल जिल्हा असून, येथील आदिवासी शेतकरी बांधव प्रामुख्याने भातशेती करतात. मात्र गेल्या काही काळात निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई आणि व्यापाऱ्यांकडून फारसा नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भातशेतीला जोडधंदा शोधायला सुरुवात केली. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी, कलिंगड, मिरची अशी उत्पादने घेत शेतीला जोडधंदा दिला. आता किरण गोवारी यांनी सूर्यफुलाची यशस्वी शेती केली.

अधिक वाचा: उन्हाळी हंगामात सूर्यफुल लागवड करून खाद्यतेलाचा खर्च वाचवा

अनेकांना घरबसल्या रोजगार मिळू शकेलबाजारात सनफ्लॉवरचे तेल विक्री होते. या तेलाला चांगली मागणी आहे. हे तेल याच फुलाच्या बियापासून तयार केले जाते. या फुलशेतीमुळे घरबसल्या रोजगार मिळू शकतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची शेती करावी, असे आवाहन शेतकरी किरण गोवारी यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातील मनोर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी भात पिकावर अवलंबून न राहता पालेभाज्या तसेच मोगरा, गुलाब लागवड तसेच सूर्यफूल लागवडीकडे वळावे, यातून आर्थिक फायदा मिळेल आणि इतरानाही रोजगार उपलब्ध होईल. - किरण रघुनाथ गोवारी, शेतकरी, सावरखंड

 

टॅग्स :सुर्यफुलकोकणशेतीशेतकरीपीकपालघरभात