Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ते ग्राहक कलिंगडाच्या थेट विक्रीतून ८० दिवसात दोन लाखांची कमाई; शेतकरी बोराटे बंधूंची किमया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:24 IST

farmer success story जनार्दन आणि मनोहर बोराटे यांची दोघा बंधूंनी कलिंगडाची अर्ध्या एकरात लागवड केली. त्यातून ८० दिवसांत १० टन कलिंगड फळ उत्पादित केले.

सचिन गायकवाडतरडगाव : लागवडीपासून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकांकडे तसेच फळांकडे शेतकरी वळू लागले आहेत.

अशाच प्रकारे फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जनार्दन आणि मनोहर बोराटे यांची दोघा बंधूंनी मॅक्स या कलिंगडाच्या जातीची अर्ध्या एकरात लागवड केली. त्यातून ८० दिवसांत १० टन कलिंगड फळ उत्पादित केले.

यामध्ये त्यांना साधारणपणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर त्यांनी शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून स्टॉलवरून या फळाची विक्री स्वतः केली हे विशेष!

व्यावसायिक शेतीसाठी एक चांगला पर्याय ठरणाऱ्या मॅक्स या जातीच्या कलिंगड फळाचा गर हा गडद लाल, रसाळ व अतिशय गोड असतो. तसेच आकर्षक फळाबरोबर मोठ्या उत्पादनासाठी ओळखला जातो.

कमी दिवसात काढणीला येत असल्याने योग्य व्यवस्थापनातून देखभाल केल्यास चांगले उत्पन्न घेता येते. हे ओळखून डिसेंबरच्या सुरुवातीलाबोराटे बंधूंनी अर्ध्या एकरात मॅक्स जातीच्या चार हजार रोपांची योग्य अंतर ठेवून लागवड केली.

लागवडीपासून ते फळ परिपक्व होईपर्यंत खत व रोग याचे योग्य व्यवस्थापन केले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कलिंगड फळ परिपक्व होऊन काढणीस आले. मार्केटमध्ये न देता त्याची स्वतः विक्री करण्याचे ठरले.

त्यानुसार रोज दीड ते दोन टन उत्पादित केलेली फळे स्वतः शेतकरी बंधूंनी लोणंद फलटण या रस्त्याच्या कडेला चांदोबाचा लिंब, विठ्ठलवाडी फाटा व बडेखान अशा विविध ठिकाणी तीन स्टॉल उभारून विक्री सुरू केली. नुकताच उन्हाचा तडाका सुरू झाल्याने विक्रीही चांगली होताना दिसली.

शेतकरी ते थेट ग्राहक विक्री◼️ मॅक्स ही जात वजनात जास्त आणि टिकाऊ असल्याने ती वाहतुकीसाठी चांगली असते.◼️ यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक या पद्धतीने वजनावर या फळाची विक्री करण्यात आली.◼️ २० ते २५ रुपये किलो असा दर लावण्यात आला. एक मोठं फळ चार ते पाच किलो भरत होते.◼️ आठवड्यात साधारण १० टन कलिंगडाची विक्री झाल्याने बोराटे बंधूंना जवळपास दोन लाख रुपये इतका आर्थिक नफा झाला.◼️ यासाठी सुरुवातीला त्यांना ६० हजार इतका खर्च आला आहे.

शेतात आम्ही वेगवेगळी पिके घेतो. मात्र, कमी कालावधीत नफा हे ओळखून तसेच वेगळा प्रयोग करण्याचे ठरवून कलिंगड फळाचे उत्पादन घेतले. यासाठी कुटुंबातील सर्वांनी लागवड, फळ काढणीपासून ते स्वतः स्टॉलवरून विक्री करण्यापर्यंत कष्ट घेतल्याने चांगले आर्थिक उत्पन्न घेता आले. - जनार्दन बोराटे, शेतकरी

अधिक वाचा: शेतजमिनी अजून महाग होणार; पुढील आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण भागातही रेडीरेकनर दर वाढणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Borate brothers earn lakhs from direct watermelon sales in 80 days.

Web Summary : Janardan and Manohar Borate earned two lakhs in 80 days by directly selling their watermelon crop. They cultivated Max variety watermelons on half an acre, yielding ten tons and selling directly to consumers.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतकरीशेतीफलोत्पादनफळेबाजार