Join us

दौंड येथील शेतकरी ज्ञानेश्वर यांचे काकडीचे तीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2023 15:27 IST

सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत खुटबाव (ता. दौंड) येथील येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुलाबराव पासलकर, यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड करुन इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे

बापू नवलेसततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत खुटबाव (ता. दौंड) येथील येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुलाबराव पासलकर, यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड करुन इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी नियंत्रित पद्धतीने शेती करून ३० गुंठ्यात काकडीचे उत्पादन घेऊन हजारो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. उन्हाळी हंगामाच्या तोंडावर काकडीची आवक कमी असते. त्यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी या हंगामाची निवड काकडीचे थेट बियाणे लावले तर थंडीमुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त होते. यामुळे रोपांचा दर्जा राखला जाऊन दर्जेदार उत्पादनवाढीस मदत होते.

पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते. पिकाला पाणी भरपूर म्हणजे एकाआड एक दिवस लागते. या भागात बोअरवेल्स तसेच धरण असल्याने पाण्याची सोय चांगली आहे. पॉली मल्चिंगचा वापर त्याचे फायदे खुरपणीचा खर्च वाचतो, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पिकाचा जोम वाढतो. काकडीला तजेलदारपणा येतो. सुरवातीला चांगली नांगरणी केली. सेंद्रिय खताचा वापर केला. त्यावर काकडीचे बियाणे डिसेंबर महिन्यात लावले. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकड्याही लागल्यात. काकडीची लागवड करताना कोंबडखत ६० बॅग आणि १०:२६:२६, मायक्रोनट असा रासायनिक खताचा बेसल डोस टाकला. मल्चिंग पेपर वापरून लागवड केली. त्या मध्ये त्यांनी तार काठी वापरून चांगल्या प्रतीची काकडी उत्पादन घेतले.

वेळोवेळी ज्योतिबा शेती भांडारचे चालक नागनाथ मुळीक यांच्या सल्ल्यानुसार किटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी व ड्रीप खातांचा वापर आणि करून भरघोस उत्पादन घेतले, काकडी विक्रीसाठी हडपसर मार्केट येथे पाठवण्यात येत आहे. २० किलो कॅरेटला सरासरी ८०० रु. भाव मिळाला, काकडी तोडा चालू होऊन ३० दिवस झाले आहेत. मशागत, बियाणे, खाते, मल्चिंगपेपर आणि मजुरी मिळून साधारण ८० हजार रुपये खर्च झाला आहे. अडीच ते महिन्याचे हे उत्पन्न आहे. छोट्या पिकात बाजार भाव मिळाला आणि उत्कृष्ट दर्जेदार पीक आले तर चांगली कमाई होते हे या शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.

क्षेत्रात वाढ..सरासरी दर किलोला १२ ते १५ रुपये राहतोच. पूर्वी हाच दर किलोला २० ते २२ रुपयांपर्यंतही मिळायचा. सर्व माल हडफसर, पुणे मार्केटला पाठवला जातो. अनेक वर्षापासून हीच बाजारपेठ पकडल्यामुळे फायदा झाला आहे. आमच्या परिसरात अलीकडील काळात काकडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकड्याही लागल्यात. उन्हाळी हंगामाच्या तोंडावर काकडीची आवक कमी असते. वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी काकडीचे थेट बियाणे लावले तर थंडीमुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त होते. यामुळे रोपांचा दर्जा राखला जाऊन उत्पादनवाढीस मदत होते.

टॅग्स :शेतकरीपुणेपीकभाज्याशेतीबाजारखते