Join us

Drumstick १६ गुंठे शेवग्याची शेती आंतरपिकातुनही केली अधिकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:37 IST

कवठे एकंद (ता. तासगाव) येथील युवा शेतकरी अभिषेक महावीर मगदूम यांनी १६ गुंठे क्षेत्रामध्ये शेवगा लागवड केले आहे. शेवग्यामध्येच कोथिंबीर, मेथी असा गरजेनुसार भाजीपाला उत्पादन घेतले.

प्रदीप पोतदारकवठे एकंद : शेती परवडत नाही असे अनुभव अनेकांना आहेत. मात्र बाजारपेठेची गरज ओळखून अवघ्या १६ गुंठे शेवगा लागवडीबरोबरच आंतरपिके घेऊन कवठे एकंदच्या युवा शेतकऱ्यांनी भरीव उत्पादन मिळवले.

कवठे एकंद (ता. तासगाव) येथील युवा शेतकरी अभिषेक महावीर मगदूम यांनी १६ गुंठे क्षेत्रामध्ये शेवगा लागवड केले आहे. शेवग्यामध्येच कोथिंबीर, मेथी असा गरजेनुसार भाजीपाला उत्पादन घेतले.

तसेच शाळूचे पिके घेऊन २०० क्विंटल ज्वारी व चाराही उत्पादित केली. न परवडणाऱ्या माळावरील शेतीलाही किफायतशीर बनवण्यासाठी अभिषेक मगदूम आणि त्यांच्या कुटुंबाने कष्ट घेतले.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये १ जूनला ओडिसी टू या जातीच्या शेवगा बियाण्यांची लागण केली. साधारणतः १६ गुंठे क्षेत्रामध्ये १८० झाडे बसवली आहेत. दोन झाडातील अंतर ८ फूट लांब व ५ फूट रुंद इतके ठेवले. मागील आठवड्यामध्ये पहिला तोडा घेतला सुमारे ३५ किलो उत्पन्न निघाले.

दर १६ रुपये इतका लागला आहे. मुंबई मार्केटला चांगला दर मिळतो. तर दुसऱ्या तिसऱ्या तोड्यात ७० किलो पर्यंतचे सरासरी उत्पादन आले. आठवड्यातून एक तोडा होऊन महिन्याला साधारणता २०० किलो सध्या शेंगा निघतात. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठेतील थेट ग्राहकांना विक्री केल्यास दहा रुपये ४ शेंगा अशी विक्री होते.

योग्य पाणी व व्यवस्थापन झाल्यास आठवड्याला २०० किलो पेक्षा अधिकची वाढ होऊन एक लाख ते दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. असे शेतकरी अभिषेक मगदूम यांनी सांगितले.

शेती तोट्यात जात असताना पाण्याची वाणवा असताना बाजारभावाची शाश्वती नसताना कमी क्षेत्रात पीक घेऊन जादा उत्पन्न घेण्याचे कसब कौतुकास्पद आहे.

आंतरपिकाचा प्रयोग यशस्वीशेवगा झाडे मोठी होईपर्यंत त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक अशी वाफ्याद्वारे पालेभाजी केल्या. झाडांमध्ये अंतर असल्यामुळे आंतरपिके घेण्यास मदत झाली. शेवगा संगोपनासाठी बरोबरच भाजीपाल्याचे पीक हे चांगले आले. साधारणता १२ ते १५ हजार रुपये उत्पन्न निघाले. आंतरपिकातूनच शेवगा व्यवस्थापन खर्चही निघून गेला. २०० किलो शाळू आणि जनावरांना चाराही मिळाला आहे.

अधिक वाचा: बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्यापीक