lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

A young man did a unique experiment, 'Pattern' of horticultural crops on Malran land. | तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

फळबागेसह बहुविध पीकपद्धतीमुळे शेतीतील जोखीम केली कमी

फळबागेसह बहुविध पीकपद्धतीमुळे शेतीतील जोखीम केली कमी

शेअर :

Join us
Join usNext

पिंपळदर येथील प्रगतिशील शेतकरी जयसिंग श्रीपत पवार यांनी दुर्गम व डोंगराळ भागात माळरान असलेली व नापीक जमीन परिश्रमातून सुपीक व विकसित केली आहे. दुष्काळी व अवर्षणग्रस्त गावातील पवार कुटुंबाने फळबागेसोबत शेतीतील जोखीम कमी करत बहुविध पीकपद्धतीतून आर्थिक बाजू भक्कम केली आहे. सिंचनाची शाश्वती नसताना खडकाळ माळरानावर अल्पशः पाण्याचे सुयोग्य नियोजन करत शेतीची उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश आले आहे.

शेतीला हंगामी पाणी असताना जयसिंग पवार यांनी जिद्दीने माळरानाचे नंदनवन करण्यास सुरुवात केली. 'जेसीबी' यंत्राद्वारे जमिनीची खोदाई, सपाटीकरण केले. दगड धोंडे वेचून माळरान व नापीक जमीन पिकाऊ सुपीक केली. मका, कांदा अशी पारंपरिक व भाजीपाला अशी पिके पहिल्या टप्प्यात घेतली. डोंगरांना लागून मुरमाड प्रतीची शेतजमीन व पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचे संकट दरवर्षीच होते. मात्र गाव परिसरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या शेतात चार विहिरी खोदूनदेखील शेतीसाठी शास्वत पाणी उपलब्ध होत नसल्याने डोंगररांगांच्या पलीकडून गिरणा नदीवर विहीर करत पाणी आणले आणि त्यानंतर त्यांच्या शेतीच रूपच पालटले. या विहिरीचा लाभ शेतीसाठी झाला. संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले. यानंतर त्यांनी पारंपरिक पिकांबरोबर डाळिंब शेती ते भाजीपाला शेती करू लागले. चोख व्यवस्थापन व सातत्य यातून ते आज शेतीत यशस्वी झाले आहेत. बारामाही शेती पीक घेताना वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग करण्यात आला आणि एकाच हंगामात अनेक पिके घेण्याचा प्रयोग यशस्वी केला.

माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

डाळिंब: 

पवार यांच्याकडे १५ एकर शेती होती. त्यातील निम्मी जमीन माळरानाची व निचरा होणारी पूर्वी खडकाळ व नापिक होती. मात्र परिश्रमातून ती विकसित केली. पवार यांची दोन्ही मुले प्रवीण व शरद ही पूर्णवेळ शेतीत आहेत. पिंपळदर गावाच्या तिघा बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, पवार यांची सर्वच जमीन डोंगराळ भागात आहे. हलकी जमीन पीकपद्धतीचा या कुटुंबीयांनी अवलंब केला आहे.

दहा वर्षांपेक्षाही अधिक काळापासून त्यांनी आपल्या नऊ एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली होती. त्यात मागील तीन चार वर्षात ६ एकर अशा पंधरा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. यावर्षी त्यांनी ९ एकर क्षेत्रावर ४० टन डाळिंबाचे उत्पादन घेतले असून त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळाले आहे.

कांदा : डाळिंब सोडून उर्वरित सात एकर क्षेत्रावर ते पाण्याचे योग्य नियोजन करत विविध पिकांची लागवड करतात. त्यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दोन एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली. यातून त्यांनी चारशे क्विंटल उत्पादन घेतले. मात्र अल्पशा बाजारभावामुळे त्यांना कांद्यातून खर्चवजा जाता कमी उत्पन्न मिळाले. मात्र एकाच हंगामात योग्य नियोजन करत त्यांनी याच क्षेत्रावर टरबूज व कोबी पिकाचेदेखील चांगले उत्पादन घेतले.

कोबी : टरबूज हे पीक निघाल्यानंतर त्याच क्षेत्रावर जुलैमध्ये कोबी लावण्यात येते. ही कोबी तसी बिगरहंगामी असते. पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणेही कसरत असते. डावण्या, करपा या रोगांचा प्रादुर्भाव सुरू असतो. दररोज बारकाईने निरीक्षण व काळजी घ्यावी लागते. टरबूज काढणी झाल्यावर याच क्षेत्रावर त्यांनी सात एकर कोबीची लागवड केली. प्रवीण व संदीप या दोघा भावांनी १६० टन कोबीचे उत्पादन घेतले. माळरान जमिनीवर बागायती पिकांचा पॅटर्न राबवत चारही पिकांचा विचार करता वर्षाला काही लाख रुपयांचा नफा सुयोग्य नियोजनाने त्यांनी मिळवला आहे.

टरबूज : कलिंगडाचे एकाचवेळी जास्त उत्पादन मिळते. व्यापारीही जागेवर येऊन माल घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात या पिकाला मागणी असते. उन्हाळ कांदा काढून झाल्यावर एप्रिल महिन्यात त्याची लागवड ते करतात. यावर्षी त्यांनी सात एकरांत साडेतीन फुटाचे गादीवाफे (बेड) तयार करत 'मल्चिंग पेपर वरती त्यांनी लागवड केली. टरबुजाच्या दर्जेदार उत्पादनामुळे व्यापारी प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन पाहणी करून शेतातच काढणी करतात. यावर्षी किलोला सरासरी बारा रुपयांपर्यंत, तर सरासरी ८ रुपयांपर्यंत दर मिळाला. सात एकरात दोनशे बारा टन उत्पादन मिळाले. त्यांना सात एकरात साठ ते सत्तर दिवसात भरघोस उत्पन्न मिळाले.

कुटुंबीयांची समर्थ साथ 

जयसिंग पवार यांची प्रवीण व संदीप ही मुले, सुना तेजस्विता, गायत्री तसेच पत्नी सिंधूबाई यांची समर्थ साथ लाभली आहे.सर्व यांत्रिकीकरण असल्याने एकही सालगडी न राखता दोघे भाऊ एकत्र ही शेती सांभाळत आहेत. प्रतिकूल स्थितीतही या कुटुंबाने जिद्दीने शेती करत असल्याचे त्यांच्या विविध प्रयोगातून दिसून येते.

Web Title: A young man did a unique experiment, 'Pattern' of horticultural crops on Malran land.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.