lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > ही आहे महाराष्ट्राची ‘पोस्टर गर्ल’, तिनं शेतकऱ्याला मिळवून दिल्या ४ बाईक

ही आहे महाराष्ट्राची ‘पोस्टर गर्ल’, तिनं शेतकऱ्याला मिळवून दिल्या ४ बाईक

4 bikes, 6 silver maces and 31 times champion gray hound dog Rajmudra satara pusegaon | ही आहे महाराष्ट्राची ‘पोस्टर गर्ल’, तिनं शेतकऱ्याला मिळवून दिल्या ४ बाईक

ही आहे महाराष्ट्राची ‘पोस्टर गर्ल’, तिनं शेतकऱ्याला मिळवून दिल्या ४ बाईक

राजमुद्रा! छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आपण ऐकली असेल पण ही राजमुद्रा ती नव्हे. ही आहे ग्रेहाऊंड जातीची फीमेल श्वान. हीने शर्यतीतून साताऱ्यातील पुसेगाव येथील सुरज जाधव यांना तब्बल ४ मोटारसायकल, ३ फ्रीज, ६ चांदीच्या गदा मिळवून दिल्या आहेत आणि तब्बल ३१ वेळा चॅम्पियन बनली आहे. जाणून घेऊया 'राजमुद्रा'बद्दल...

राजमुद्रा! छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आपण ऐकली असेल पण ही राजमुद्रा ती नव्हे. ही आहे ग्रेहाऊंड जातीची फीमेल श्वान. हीने शर्यतीतून साताऱ्यातील पुसेगाव येथील सुरज जाधव यांना तब्बल ४ मोटारसायकल, ३ फ्रीज, ६ चांदीच्या गदा मिळवून दिल्या आहेत आणि तब्बल ३१ वेळा चॅम्पियन बनली आहे. जाणून घेऊया 'राजमुद्रा'बद्दल...

शेअर :

Join us
Join usNext

बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांना नवीन नाहीत. इतिहासातही बैलगाडा शर्यतीबद्दल उल्लेख आढळतात. पण अलीकडे काही वर्षांपासून महाराष्ट्रात श्वान शर्यतीलाही चांगला वाव मिळू लागला आहे. राज्यातील अनेक शेतकरी आपले शिकावू श्वान शर्यतीत उतरवत असतात. तर सुरज जाधव आणि त्यांचे बंधू शशी देशमुख हे श्वान शर्यतीसाठी श्वान पालन करत असून त्यांनी अनेक बक्षीसे जिंकवली आहेत. राजमुद्रा ही आमच्यासाठी अनेक वर्षांपासून वरदान ठरली असल्यातं ते सांगतात.

'राजमुद्रा'ची कामगिरी
'राजमुद्रा' ही सध्या राज्यातील सर्वात जास्त बक्षिसे मिळवणारी श्वान आहे. तीने एवढे बक्षिसे मिळवल्यामुळे 'महाराष्ट्राची शिवशाही एक्सप्रेस' अशी उपाधी तिला दिली आहे. त्याचबरोबर सध्या ती 'महाराष्ट्राची पोस्टर गर्ल' म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. शर्यतीसाठी नेल्यावर तिला पाहण्यासाठी गर्दी होते.

खुराक आणि संगोपन
ग्रेहाऊंड जातीच्या श्वानाला चिकन आणि भाकरी दिली तरी त्यांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. त्याचबरोबर कॅल्शिअम आणि विवध अन्नद्रव्ये त्यांना खाद्यातून द्यावे लागतात. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शर्यतीत किंवा सराव करताना होणाऱ्या जखमांकडे लक्ष द्यावे लागते असं शशी देशमुख यांनी सांगितले.

संगोपनाचा खर्च
या श्वानाच्या संगोपनाला जास्त खर्च येत नाही. बैल किंवा उतर प्राण्यांच्या तुलनेने हा खर्च कमी असतो. त्यामुळे सामान्य शेतकरी सुद्धा या श्वानाचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून शर्यतीत सहभाग घेऊ शकतात.

आर्थिक उत्पन्न
बैलगाडा शर्यतीप्रमाणेच श्वान शर्यतीलाही चांगली आता चांगले दिवस आले असून अनेक शेतकरी आपले शिकाऊ श्वान शर्यतीसाठी उतरवतात. तर पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या श्वासानासाठी ६० हजार ते एक लाखांपर्यंतचे बक्षीस असते. तर सध्या एका शर्यतीमध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या श्वानाला महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून ठेवली आहे. त्याचबरोबर मोटारसायकल, कार, फ्रीज, गदा, रोख बक्षिसेही असतात. योग्य पद्धतीने संगोपन करून शर्यतीसाठी तयार केले तर श्वान आपल्याला चांगला नफा मिळवून देऊ शकतो असं जाधव यांनी सांगितले. 

श्वान शर्यतीचा नाद
जसा शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद आहे तसा आम्हाला श्वान शर्यतीचा नाद आहे. आम्ही या श्वानाचा सांभाळही योग्य पद्धतीने करतो त्यामुळे तीने आम्हाला चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे. येणाऱ्या काळात श्वान शर्यतीला चांगली पसंती मिळत असून शेतकऱ्यांनीही श्वान शर्यतीकडे वळाले पाहिजे.
- सुरज जाधव (श्वानपालक शेतकरी, पुसेगाव)

Web Title: 4 bikes, 6 silver maces and 31 times champion gray hound dog Rajmudra satara pusegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.