Join us

तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:40 IST

Tur Popular Variety तूर पिकात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तुरीचे उत्पादन २० ते २५ क्विटलपर्यंत नेणारे शेतकरी आहेत. अवर्षणप्रवण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे.

तूर पिकात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तुरीचे उत्पादन १५ ते २० क्विटलपर्यंत नेणारे शेतकरी आहेत. अवर्षणप्रवण भागात पाण्याचा प्रश्नामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे. अशावेळी तूर पिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तुरीचे हे तीन वाण शेतकऱ्यांत खूप लोकप्रिय झाले आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या या वाणांना शेतकऱ्यांची मोठी पसंती आहे.

१) बीडीएन-७११ (पांढरी)कालावधी (दिवस)  : १५० ते १५५प्रति एकर बियाणे : ५ ते ६ किलोसरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) : ७ ते ८वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग पांढरा, हा वाण कोरडवाहू लागवडीस योग्य तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे.

१) बीडीएन-७१६ (लाल)कालावधी (दिवस)  : १६५ ते १७०प्रति एकर बियाणे : ५ ते ६ किलोसरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) : ८ ते ९वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग लाल व शेंगांचा रंग पुर्ण हिरवा तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे.

१) बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) (पांढरी)कालावधी (दिवस)  : १६० ते १६५प्रति एकर बियाणे : ५ ते ६ किलोसरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) : १० ते ११वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग पांढरा आहे. १०० दाण्याचे वजन ११ ग्रॅम एवढे आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रसारीत झालेल्या इतर वाणांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पादन देणारा वाण.

अधिक वाचा: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे टॉप ५ वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :तूरशेतकरीशेतीपीकखरीपपेरणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठमराठवाडाकीड व रोग नियंत्रण