कांदा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे बागायती पीक आहे. बदलते हवामान जसे अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, धुके, थंडीचे प्रमाण अचानक कमी होणे यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य, विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा आणि मावा, फुलकिडे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये ५०-६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
१) करपाकांदा पिकावर पातीवर पांढुरके खोलगट चट्टे दिसतात. मधला भाग काळपट जांभळट होऊन पात शेंड्याकडून वाळू लागते. हवेमध्ये दमटपणा वाढल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात वाढतो, पिकाची वाढ खुंटते आणि नुकसान होते.
२) मावा फुलकिडेकांदा पातीच्या बेचक्यात दडून बसतात आणि पाती खरवडून आतील अन्नरस शोषन करतात, त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटते. खरडलेल्या भागातून काळा किंवा जांभळा करपा या बुरशीचा शिरकाव वाढतो.
उपाययोजना१) डायथेन M-45 ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रती लि. पाण्यातून दर १०-१५ दिवसांनी फवारणी करावी.२) हेक्झाकॉनाझोल १ मिली किंवा क्लोरोथेरोनोल २.५० ग्रॅम प्रती ली. पाण्यातून फवारणी करावी.३) बुरशीनाशक फवारणी करताना औषध द्रावण पिकावर चिकटण्यासाठी स्टिकरचा वापर करावा.४) पिकाला जास्त पाणी देऊ नये. पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.५) तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.६) मावा व फुलकिडे नियंत्रणासाठी कार्बोसल्फान 25 EC. १ मिली किंवा प्रोपिनोफॉस १ मिली किंवा फिप्रोनिल १ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करणे.७) फुलकिडे नियंत्रणासाठी निळ्या व पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.८) शेत तणविरहित ठेवावीत.९) एका शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी ठराविक काळामध्ये फवारणी केली तर रोगाचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते.
अधिक वाचा: एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर