Join us

Tomato Rog : टोमॅटो पिकात कोणत्या किडींमुळे येतात कोणते रोग? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:53 IST

अन्नद्रव्यांचे शोषण करत असतात. त्या दरम्यान एखादी रसशोषक कीड जर विषाणूग्रस्त वनस्पतीमधून अन्नद्रव्य शोषण करत असेल तर त्या अन्नद्रव्यासोबत त्यांच्या शरीरात विषाणू जातात.

अन्नद्रव्यांचे शोषण करत असतात. त्या दरम्यान एखादी रसशोषक कीड जर विषाणूग्रस्त वनस्पतीमधून अन्नद्रव्य शोषण करत असेल तर त्या अन्नद्रव्यासोबत त्यांच्या शरीरात विषाणू जातात.

पुढे जेव्हा ही कीड निरोगी वनस्पतीवर रस शोषण करते तेव्हा पुन्हा त्या निरोगी वनस्पतीवर रोगाची लागण होते. विषाणू रसशोषक किडींच्या शरीरात गेल्या नंतर, मावा किडीच्या शरीरात ते अल्प काळासाठी राहतात तर पांढरी माशी व फुलकिडे यांच्या शरीरात ते दीर्घकाळासाठी किंवा त्यांच्या जीवन कालावधीपर्यंत सक्रिय राहतात.

टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या प्रमुख रसशोषक किडींची ओळख१) मावा- मावा ही कीड रोपवाटीकेपासुन ते टोमॅटोची काढणी पर्यंत नुकसान करणारी कीड आहे.- हिरव्या पिवळसर रंगाची पिल्ले व त्यांचे प्रौढ टोमॅटोच्या कोवळ्या पानांतील रस शोषण करतात व त्यामुळे पाने पिवळी पडतात.- रस शोषण करत असताना ते विषाणूजन्य रोगांचा प्रसार निरोगी झाडांमध्ये करतात.- प्रसारीत होणारे विषाणूजन्य रोग : कुकूम्बर मोझॅक व्हायरस, टोबॅको व्हेन डीस्टोर्शन व्हायरस.

२) पांढरी माशी- पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालच्या बाजुला लपून रसशोषणाचे काम करत असतात त्यामुळे पानांच्या कडा खालील बाजूस वळतात तसेच पाने पिवळी पडतात.- दमट आणि कोरड्या वातावरणात या माशीचा प्रादुर्भाव वाढत असतो.- प्रसारीत होणारे विषाणूजन्य रोग : टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस, टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस.

३) फुलकिडे- पिल्ले आणि प्रौढ पाने खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात व पाने पिवळी पडतात. - पानांमधून रस शोषण करत असताना पानांवरती ओरखडल्या सारखे डाग निर्माण करतात.- पानांमधून तसेच फुलांच्या देठांतून रसशोषणाचे काम करतात.- प्रसारीत होणारे विषाणूजन्य रोग : टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस (टॉस्पो व्हायरस) किंवा ग्राऊंडनट बड नेक्रोसिस व्हायरस.

अधिक वाचा: उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी कमी खर्चातील सोप्या पिक आच्छादन पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

टॅग्स :टोमॅटोकीड व रोग नियंत्रणशेतीशेतकरीपीकभाज्या