Join us

PM Kisan : पीएम किसानचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:31 IST

PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (पीएम किसान सन्मान) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा सातबाराधारक शेतकरी पात्र ठरविला जातो.

राज्याचा रहिवासी नाही, दोन वेळा नोंदणी, निमशासकीय कर्मचारी, संविधानिक पदावरील व्यक्ती, सज्ञान नसलेले, ओळख नसलेले शिवाय अनिवासी भारतीय असे  शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.

या अपात्र शेतकऱ्यांपर्यंत जाऊन नव्याने कागदपत्रे घेतली जात आहेत. योजनेच्या लाभासाठी पात्र की अपात्र हे समितीने अद्याप ठरविले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (पीएम किसान सन्मान) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा सातबाराधारक शेतकरी पात्र ठरविला जातो. योजना सुरू करताना आधार कार्डबँक पासबुक झेरॉक्स दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला होता.

अनेक शेतकऱ्यांनी योजनेची खिल्ली उडवत आधार कार्डबँक पासबुक दिले नव्हते. गाव पातळीवर तलाठी, कोतवालांनी वारंवार मागणी केल्यानंतरही शेतकऱ्यांनी दाद दिली नव्हती.

राज्य शासनाकडूनही प्रति वर्ष सहा हजार रुपये जाहीर करण्यात आले. मग राहिलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्र देण्याची तयारी दर्शविली. कागदपत्रे जोडून दिली खरी मात्र महसूल व कृषी खात्याकडून तपासणी करण्यात आली.

त्यावेळी विविध कारणांमुळे शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. या अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर कृषी सहाय्यकाकडे तपासणीसाठी देण्यात आल्या आहेत.

शेतकरी कशामुळे ठरता आहेत अपात्र?- महाराष्ट्राचा रहिवासी नसल्याने.- संविधानिक पदावर असताना लाभ घेतलेले.- दुबार नोंदणी.- स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय कर्मचारी.- जमीन विक्रीमुळे भूमिहीन झालेले.- माजी संविधानिक पदावरील व्यक्ती.- अगोदर कुटुंब प्रमुखास लाभ मिळत आहे.- संस्था मालकी असलेला जमीनधारक.- १ फेब्रुवारी २०१९ नंतरचा जमीनधारक.- जमिनीची मालकी स्वतःच्या नावे नसलेले.- शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक.- अनिवासी भारतीय.- नोंदणीकृत व्यावसायिक.- सेवानिवृत्त लाभधारक.- सज्ञान नसलेले.- ओळख न पटलेले.- वर्गीकरण न केलेले लाभार्थी.- खोट्या माहितीवर नोंदणी.- आयकर भरणारे.

तपासणी सुरूअपात्र ठरलेल्या पैकी शेतकऱ्यांनी कागदपत्र पुन्हा सादर केली आहेत, तर काही शेतकऱ्यांची तपासणी सुरू असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. कृषी आयुक्त कार्यालयाकडून तपासणी झाल्यानंतरच पात्र किंवा अपात्र ठरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अपात्र ठरलेल्या याद्या गावपातळीवर पाठवल्या आहेत. कृषी सहायक तपासणी करून योग्य असलेल्यांचे प्रस्ताव पुन्हा सादर करण्यास सांगणार आहेत.

शेतकऱ्यांनी अपात्र झालेले प्रस्ताव फेरसादर करावेत. जे शासनाच्या निकषात या योजनेसाठी बसत नाहीत, त्यांनी प्रस्ताव सादर करू नयेत. अडचण असल्यास कृषी सहायकांना संपर्क करावा.

अधिक वाचा: Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीसरकारी योजनाकेंद्र सरकारबँकआधार कार्डमहसूल विभागराज्य सरकारपंतप्रधान