आंबिया बहार
पावसाच्या खंडाच्या काळात ओलीत करावे. नागपुर संत्रा आंबिया बाहाराच्या फळांसाठी सप्टेंबर महिन्यात ६वर्ष व त्या पेक्षा जास्त पूर्ण वाढ झालेल्या झाडा करिता ठिबक सिंचनाद्वारे ६३ लिटर/दिवस/झाड पाणी द्यावे
संत्र्या करीता ठिबक द्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
- आंबिया बाहाराच्या फळांसाठी सप्टेंबर महिन्यात २४ ग्रॅम नत्र (५२ ग्रॅम युरिया) + २० ग्रॅम पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश ३३ ग्रॅम) प्रतिझाड १५ दिवसाच्या अंतराने द्यावे.
- आंबिया बहाराचे संत्रा फळाच्या वाढी नुसार एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतुन रासायनिक खताची पाचवी/शेवटची मात्रा ९० ग्रॅम नत्र (१९५ ग्रॅम युरिया) ७५ ग्रॅम पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश १२५ ग्रॅम) प्रती झाड द्यावे.
मृग बहार
- मृग बहारात ठिबक द्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापना करिता सप्टेंबर महिन्यात ७२ ग्रॅम नत्र (१५६ ग्रॅम युरिया)+ २८ ग्रॅम स्फुरद (१७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८ ग्रॅम पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश १४ ग्रॅम) १५ दिवसाच्या अंतराने द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट एक दिवस अगोदर पाण्यात भिजू घालावे व विरघळलले द्रावण कोणत्याही खता सोबत न मिसळता वापरावे.
- पावसाच्या खंडाच्या काळात ओलीत करावे. नागपुर संत्रा मृग बाहाराच्या फळांसाठी सप्टेंबर महिन्यात ६वर्ष व त्या पेक्षा जास्त पूर्ण वाढ झालेल्या झाडा करिता ठिबक सिंचनाद्वारे ६३ लिटर/दिवस/झाड पाणी द्यावे.
रोग व्यवस्थापन
फुट फ्लाय
- ग्रीनिंग-संक्रमित झाडे आढळल्यास (फळांची वैशिष्ट्यपूर्ण पिवळट हिरवीगार लक्षणे दिसल्यास किंवा चाचणीनंतर संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यास), टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराईड ६०० पीपीएम (६ ग्रॅम / १० लिटर पाणी) ची फवारणी करावी.
- मूळसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेफेनॉक्सॅम एमड्रोड २५ ग्रॅम / १० लिटर पाणी) झाडाच्या परिघातामध्ये आळवणी (६-१०) लिटर द्रावण प्रति झाड झाडाच्या आकारावर अवलंबून) तसेच फवारणी करिता उपयोगात आणावे
- किंवा फॉसेटाइल एएल (२५ ग्रॅम / १० लिटर पाणी) या बुरशीनाशकाची ४० दिवसांच्या अंतराने दोनदा झाडावर फवारणी करावी.
- मूळकुज किवा तीव्र मर रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम झाडवरची फळे काढून टाकावीत.
- त्यानंतर मेफेनॉक्सम एमझेड (२५ ग्रॅम) कार्बन्बॅझिम (१० ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून असे मिश्रण झाडाच्या परिघातामध्ये ड्रेचिंग करावे.
तपकिरी फळ कुज (ब्राऊन रॉट)
- तपकिरी फळ कुज (ब्राऊन रॉट) चे संक्रमण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपायासाठी फॉसेटाइल एल २५ ग्रॅम/१० लिटर पाणी (४० दिवसांच्या अंतराने दोनदा) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लुपी ३० ग्रॅम / १० लिटर या बुरशीनाशकाची फवारणी गरजेची आहे.
- ट्रायकोडर्मा हर्झियानम (एनआरसीएफबीए-४४) पावडर आधारित फॉम्र्युलेशन १०० ग्रॅम / झाड १ किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून) झाडाच्या परिघातामध्ये मिसळावे.
- ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक हे रासायनिक बुरशीनाशक वापरल्यानंतर एक महिन्याने द्यावे.
- कोलेटोट्रिकम आणि डिप्लोडिया बुरशी संबंधित फळांची गळसाठी प्रभावित झाडांवर प्रोपिकोनाझोल २५ ईसी (१० मिली) किंवा थायोफेनेट मिथाइल ७५ डब्लूपी (२० ग्रॅम १० लिटर पाणी घेऊन) १० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
- अझोक्सखोबीन १८.२% + डायफेणकोणाझोल ११.४% (मिश्रघटक) बुरशीनाशकाची (१० मिली / १० लिटर पाणी) फवारणी पर्यायी म्हणून घ्यावी.
- बागेतील गळून पडलेली फळे काढून टाकणे आणि जाळून नष्ट करणे व वाफा स्वच्छ ठेवणे.
कीटक व्यवस्थापन
- या कालावधीत अंबिया बहाराची फळे परिपक्व होण्याच्या प्रक्रियेत असतात; रंग बदल झाल्याने फळ शोषणारा पतंग व फळ माशीचा उपद्रव या महिन्यांच्या ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत दिसून येतो.
- पावसाळ्यात फळातील रस शोषणाऱ्या पतंगांच्या अळ्या या यजमान वनस्पती उदा. गुळवेल, वासंनवेल यांच्यावर उपजीविका करतात करिता फळबागांचा परिसर आणि आजूबाजूच्या शेतात व्यापक मोहीम राबवून यजमान वनस्पती व अळ्या नष्ट करणे आवश्यक आहे.
- फळमाशीचा उपद्रव कमी करण्यासाठी गळून पडलेली फळे गोळा करणे आणि त्यांचा नाश करणे जेणेकरून फळमाशीच्या जीवनक्रीये मध्ये बाधा निर्माण होऊन त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
- तसेच बागेत फळ माशांच्या नर माशा यांना आकर्षित करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिथाइल युजेनॉल सापळे हेक्टरी २० लावावेत.
- प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळ्यातील लूर ४५-६० दिवसाच्या अंतराने बदलावेत.
- चागांमध्ये संध्याकाळी उशिरा सुक्या कचऱ्यावर ओला कचरा टाकून धुराची निर्मिती केल्याने फळ रस शोषक पतंग बागेपासून दूर ठेवण्यास मदत होते.
- तसेच संध्याकाळी ७ ते ११ कालावधीत प्रकाश सापळ्यांचा सुद्धा शेतात वापर करावा.
- फळ रस शोषक पतंग यांना आकर्षित करण्यासाठी विषारी आमिषे तयार करून ठेवावीत.
- याकरिता पसरट भांड्यात खाली पडलेल्या संत्रा फळपिकाचा रस १०० मिली + १०० ग्रॅम गुळ मॅलेथिऑन ५० ईसी १० मिली + १०० मिली पाणी घेऊन मिश्रण तयार करून घ्यावे व प्रती एकर ८ ते १० या प्रमाणात झाडास लाटकावेत.
- कडुनिंबाचे तेल १०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळण्यासाठी प्रथम १०० मिली तेलात १० मिली टीपॉल किंवा डिटर्जंट वॉशिंग पावडर १० ग्रॅम मिसळावी.
- यांचा वापर इमल्सीफायर म्हणून करावा किंवा पेट्रोलियम स्प्रे ऑईल (होर्टीकल्चर मिनरल ऑईल) २०० मिली/१० लिटर पाणी घेऊन मिसळून याची फवारणी फळांच्या परिपक्वता दरम्यान ते फळ काढण्यापर्यंत १०-१५ दिवसांच्या अंतराने चालू ठेवावी.
- पाने खाणाऱ्या अळीचे (लेमन बटरफ्ल्याय) जैविकरित्या व्यवस्थापनासाठी बीटी १० ग्रॅम / १० लिटर पाणी किंवा फिश ऑइल रोझिन साबण ५० ग्रॅम / १० लिटर पाणी ची फवारणी करावी.
- शेतामधील तसेच शेताच्या बांधावरील बेल, बावची आणि मेरा यजमान तणाचा नाश करावा.
- पाने खाणाऱ्या सुरवंटाच्या रासायनिक व्यवस्थापनासाठी किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर किनॉलफॉस २५ ईसी २० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- किडींची प्रौढ अवस्थेतील व्यवस्थापनासाठी शेतात पिवळे चिकट सापळे @ ३० / एकर (३०x४० सेंमी आकाराची फोम शीट उपयोगात आणून त्यावर स्टीकर म्हणून एरेंडल तेल लावून साप्ताहिक अंतराने जमिनीच्या पृष्ठभागापासून १.५ ते २.० मीटर उंचीवर लावावेत.
- कृषि विभाग, सिट्रस इस्टेट, उमरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती