Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा मोहरला पण ढगाळ हवामानाने करपा व भुरीचे संकट वाढले; करा 'ह्या' तेलांची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:06 IST

amba bhuri niyantran हापूस, केशर, तोतापुरी, राजापुरी यांसारख्या कलमांची लागवड असल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक आधार होत आहे.

हापूस, केशर, तोतापुरी, राजापुरी यांसारख्या कलमांची लागवड असल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक आधार होत आहे.

यंदा आंबा आठ-दहा दिवसांपूर्वीच मोहरला असल्याने फळधारणा चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

मात्र, सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे करपा, भुरी सारखा रोग पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधव चिंतित आहेत.

शेतकरी बांधव चिंतित◼️ गतवर्षी आंबा मोहर अत्यल्प प्रमाणात लागल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता.◼️ मात्र, २०२५-२६ या हंगामात निसर्ग अनुकूल ठरल्याने आंबा मोहर साधारण दोन आठवडे लवकर आणि भरघोस प्रमाणात आला आहे. अनेक ठिकाणी झाडे मोहराने लगडली आहेत.◼️ निसर्गाची अशीच साथ मिळाल्यास यावर्षी आंबा फळांचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

ढगाळ वातावरणात फवारणी आवश्यक◼️ अशा परिस्थितीत करपा, भुरी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.◼️ वेळीच नियंत्रण मिळाले नाही, तर फळधारणा कमी होऊन फळगळ मोठ्या प्रमाणात होते.◼️ गेल्या आठवड्यात पडलेल्या तीव्र थंडीमुळे अनेक ठिकाणी मोहर करपला आहे.◼️ पुढील काळातही थंडीची लाट व ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, अशा प्रतिकूल वातावरणात एक ते दोन फवारे आवश्यक आहेत. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कोणती औषधे आणि किती प्रमाणात फवारावी?◼️ मोहर लागल्याने परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सौम्य व नाजूक औषधांचीच फवारणी करावी.◼️ करंज तेल व नीम तेल यांचे आलटून पालटून फवारे घ्यावेत.◼️ २० लीटर पाणी पंपासाठी लिक्विड गंधक २५ ते ३० मिलिलिटर, नीम तेल ३५ ते ४० मिलिलिटर, स्टीकर म्हणून लिक्विड साबण ३ मिलिलिटर हे मिश्रण नीट एकत्र करून फवारणी करावी.◼️ वेळीच सर्व व्यवस्थापन पूर्ण केल्यास विपुल उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

महत्वाचे: आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या तज्ञांशी संपर्क साधूनच पिक संरक्षणासाठी फवारण्या कराव्यात.

अधिक वाचा: अमेरिकेच्या कॉर्पोरेट शेतीपुढे भारतीय शेतकरी तग धरणार का? आपल्या शेती क्षेत्रावर कसा होईल परिणाम?

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Blossoms Vulnerable: Cloudy Weather Threatens; Spray These Oils!

Web Summary : Mango farmers face disease risks due to cloudy weather despite early blossoming. Experts advise spraying Karanj and Neem oil mixtures to protect against blight and pests, ensuring a good yield. Contact agricultural experts for specific spray recommendations.
टॅग्स :आंबाहवामान अंदाजतापमानफळेकीड व रोग नियंत्रणहिवाळा