Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lemon Variety लिंबू लावताय, ह्या आहेत लिंबाच्या टॉप तीन जाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:17 IST

कागदी लिंबामध्ये स्थानिक जातीपासून लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात अधिक उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.

लिंबामध्ये दोन प्रकार आहेत एक लाईम (पातळ सालीचे लिंबु) आणि दुसरा प्रकार लेमन (जाड सालीचे), महाराष्ट्र राज्यात कागदी लिंबाच्या फळांना जास्त मागणी असल्यामुळे त्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लेमनची फळे लोणच्यासाठी चांगली असतात.

जातीकागदी लिंबामध्ये स्थानिक जातीपासून लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात अधिक उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यांची निवड करणे शेतकऱ्यांना जास्त फायद्याचे ठरते. त्यापैकी काही जाती प्रमालीनी, विक्रम, साईशरबती, त्यांचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.

१) प्रमालिनी• स्थानिक जातीपेक्षा ३५ ते ३९ टक्के जास्त उत्पादन देणारी• फळधारणा घोसात (गुच्छात ३ ते ७ फळे)• फळधारणा जुन-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होते.• रसाचे प्रमाण ५७ टक्के.

२) विक्रम• स्थनिक जातीपेक्षा ३० ते ३२ टक्के उत्पादन जास्त.• फळे ५ ते १० गुच्छात येतात.• फळसाधारण जून-जुलै, नोव्हेंबर-डिसेंबर व नेहमीच्या हंगामाव्यतिरिक्त होते व उन्हाळ्यात फळे मिळतात.

३) साई शरबती• पश्चिम महाराष्ट्रातील स्थनिक जातीपासून निवड पद्धतीने जात विकसीत केली आहे.• फळे नियमीत आकाराची जास्त विद्राव्य पदार्थ व आम्लता असलेली व अधिक उत्पादन देणारी जात.• उन्हाळ्यात २५ टक्के जास्त उत्पादन देणारी.• रसाचे प्रमाण ५५ टक्के.• खैऱ्या रोगास प्रतिकारक.

अधिक वाचा: नारळाला लवकर फळ लागलं पाहिजे तर ह्या जातींची लागवड करा

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतीशेतकरीपीक