Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोबीवर्गीय पिकांवरील रायसीनेस म्हणजे काय, नेमके कशामुळे होते, यावर उपाय काय करावा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:45 IST

Agriculture News : कोबीवर्गीय पिकांवरील रायसीनेस (Raisiness) म्हणजे फुलकोबी आणि ब्रोकोलीच्या गड्ड्यांमध्ये होणारी एक....

Agriculture News :    कोबीवर्गीय पिकांवरील रायसीनेस (Raisiness) म्हणजे फुलकोबी आणि ब्रोकोलीच्या गड्ड्यांमध्ये होणारी एक विकृती आहे, ज्यात गड्डा कडक, कोरडा आणि चवीला कडवट बनतो. हे नेमके कशामुळे होते, यावर उपाय काय करावा, हे समजून घेऊयात.... 

कोबीवर्गीय पिके - रायसीनेस

  • ही विकृती फुलकोबी आणि ब्रोकोलीवर दिसते.
  • फुलकोबी हे पीक तापमान आणि आर्द्रतेतील चढ-उतारास फारच संवेदनशील आहे. 
  • अस्थिर आणि प्रतिकूल तापमानाशिवाय, उच्च आर्द्रता, नत्रयुक्त खताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्याने रायसिनेस होतो. 
  • गड्ड्यांची काढणी उशिरा केल्यावरदेखील ही विकृती निर्माण होते. 
  • गड्ड्यावर फुलांच्या बारीक कळ्या पसरून मखमलीसारखे आवरण दिसते. 
  • फुलकोबीचा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत व मोकळा दिसतो. त्यामुळे फुलकोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते.

 

उपाय

  • लागवडीच्या ठराविक हंगामासाठी योग्य वाणांची निवड करावी. 
  • शुद्ध व खात्रीलायक बियाणे वापरावे. 
  • तापमानात जास्त चढ-उतार असणाऱ्या भागात प्रतिकारक जातींची निवड करावी. (उदा. पुसा शुभ्रा, पुसा दीपाली)
  • फुलकोबीच्या गड्ड्याची काढणी योग्य वेळी करावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी