Join us

Agriculture News : काकडी, दुधी भोपळा, कारल्यांसाठी खत व्यवस्थापन कसे कराल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:25 IST

Agriculture News : काही भागात पावसाचा खंड पडला आहे. अशा वेळी वेलवर्गीय पिकांसाठी खत देणे उपयुक्त ठरते.

Agriculture News : सद्यस्थितीत काही भागात पाऊस सुरु आहे. तर काही भागात पावसाचा खंड पडला आहे. अशा वेळी वेलवर्गीय पिकांसाठी खत देणे उपयुक्त ठरते. यामध्ये काकडी, दुधी भोपळा, कारले पिकांचा समावेश आहे. या पिकांना खतांची मात्रा कशी द्याल, हे समजून घेऊयात... 

वेल वर्गीय पिके खत व्यवस्थापन

  • काकडी, दुधी भोपळा, कारले पिकाला प्रत्येकी १० किलो नत्र (२२ किलो युरिया) प्रति एकरी या प्रमाणे लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी द्यावे. 
  • एकूण खतमात्रा प्रति एकरी ४० किलो नत्र. २० किलो स्फुरद, २० किलो पालाश अशी असून, नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीसोबत देण्याची शिफारस आहे. 
  • दोडका पिकाला प्रत्येकी ७ किलो नत्र (१५ किलो युरिया) प्रति एकरी या प्रमाणे लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे. 
  • एकूण खतमात्रा प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश अशी असून, नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीसोबत देण्याची शिफारस आहे. 
  • वरखताच्या मात्रा बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे. 
  • खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
  • रांगडा कांदा लागवडीसाठी बियाण्याची पेरणी करावी.

हवामानाचा अंदाज लक्ष्यात घेता कोरडवाहू जमिनीच्या क्षेत्रात (मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव, येवला व सटाणा) वातावरणातील ओलावा संरक्षणासाठी कंपार्टमेंट बांधासारख्या संरचना तयार करा.

तसेच पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी. उत्तर - पूर्वेकडील (मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव, येवला व सटाणा) मैदानी व अवर्षण प्रवण विभागात पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय सेवा संशोधन केंद्र, इगतपुरी 

Mahadbt Lottery List : महाडीबीटीवर फळबाग लागवड योजनेची निवड यादी आली, तुमचं नाव चेक करा!

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनकृषी योजना