Join us

Vegetable Farming : भाजीपाला पिके उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी कोणत्या? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:52 IST

Vegetable Farming : उन्हाळी हंगामात भाजीपाला (Vegetbale Farming) उत्पादन वाढीसाठी कसे नियोजन करावे, हे समजून घेऊया.... 

Vegetable Farming :  उन्हाळी हंगामात भाजीपाला (Bhajipala Lagvad) लागवडीला शेतकरी प्राधान्य देतात. मात्र तापमान अधिक असल्याने काळात भाजीपाला शेतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा वाढत्या तापमानाचा फटका पिकावर होतो, परिणामी बाजारात भाजीपाला दर वधारल्याचे दिसून येते. यामुळे उन्हाळी हंगामात भाजीपाला (Vegetbale Farming) उत्पादन वाढीसाठी कसे नियोजन करावे, हे समजून घेऊया.... 

वेलवर्गीय भाजीपाला पिके उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी

  • लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड
  • कीड-रोग प्रतिकारक तसेच दर्जेदार उत्पादन आणि अधिक तापमानास सहनशील वाणांची निवड
  • बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया
  • दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर
  • आच्छादनाचा वापर
  • ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब
  • शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर
  • वाढीच्या अवस्थेनुसार योग्य संजीवकांचा वापर
  • योग्यवेळी आंतरमशागतीची कामे
  • वळण व आधार देणे
  • रोपवाटिका ते फळधारणा अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब
  • उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेडनेट) वापर

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी. 

टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन