Join us

Vegetable Crops : वेलवर्गीय पिकांमध्ये संजीवकांचा वापर का आणि कसा करावा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:40 IST

Vegetbale Crops : संजीवके पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपयोगी ठरतात. संजीवकाचे आणखी काय फायदे आहेत, ते पाहुयात.... 

Vegetbale Crops :    वेलवर्गीय पिकांमध्ये जसे कि काकडी, कलिंगड, भोपळा यामध्ये संजीवकांचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. संजीवके पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपयोगी ठरतात. संजीवकाचे आणखी काय फायदे आहेत, ते पाहुयात.... 

  • वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नर आणि मादी फुले येतात. 
  • त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त आणि मादी फुलांचे प्रमाण कमी असते. 
  • मादी फुलांपासून फळधारणा होऊन फळे मिळतात. त्यासाठी मादी फुले जास्त आणि नर फुले कमी असावी लागतात. 
  • त्यासाठी काही संजीवकांचा वापर करता येतो.
  • उदा. काकडी पिकामध्ये इथ्रेल हे संजीवक १५०-२०० पीपीएम याप्रमाणे पीक दोन आणि चार पानांवर असताना फवारणी केली असता नर फुलांचे प्रमाण कमी होऊन मादी फुलांचे प्रमाण वाढते. 
  • परंतु सध्या बाजारामध्ये काकडीच्या ज्या जाती उपलब्ध आहेत, त्यावर संजीवकाची फवारणी करू नये. कारण या जातींमध्ये फक्त मादी फुले येतात आणि संजीवकाची फवारणी केल्यास नर फुले येऊ शकतात.
  • हवामानाचा अंदाज लक्ष्यात घेता कोरडवाहू जमिनीच्या क्षेत्रात (मालेगाव, नांदगाव, येवला व सटाणा) वातावरणातील ओलावा संरक्षणासाठी कंपार्टमेंट बांधासारख्या संरचना तयार करा. 
  • तसेच पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.
  • रांगडा कांदा लागवडीसाठी बियांची गादीवाफ्यावर पेरणी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी.
  • पूर्वेकडील (मालेगाव व नांदगाव) तसेच उत्तरेकडील (सटाणा व देवळा) अवर्षण प्रवण विभागात पडणा-या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाय योजना करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेतीभाज्या