Agriculture News : प्रादुर्भावित, इजा झालेल्या फुलकळ्या किंवा फळे काढून टाकावीत. शिफारशीप्रमाणे फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. अधिक फुल आणि फळधारणेसाठी थोडीशी वाट पहावी. समाधानकारक फुले व फळधारणा दिसल्यास शिफारशीप्रमाणे एकात्मिक रोग-कीड व्यवस्थापन करून बहर चालू ठेवावा. अन्यथा बाग विश्रांतीवर ठेवावी. पुढील पीक हंगामासाठी, बहराची तयारी करावी.
सर्व फळांचे नुकसान, फांद्या तुटणे/ चिरणेसर्व नुकसानग्रस्त फळे काढावीत. तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटून बागेबाहेर खड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्या, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस भरून बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे. पुढील बहराची तयारी करावी.
लिंबू आकाराची फळे७५% फळांचे गारपीट, पावसामुळे नुकसान झाले असल्यास झाडावरील सर्व फळे काढून टाकावीत. शिफारसीप्रमाणे पुढील बहराची तयारी करावी. २५% किंवा कमी प्रमाणात फळांचे नुकसान झालेले असल्यास बाधित फळे काढून टाकावीत. शिफारशी प्रमाणे फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
तोडणी साठी तयारफळेगारपिटीमुळे फळांना इजा झालेली असल्यास बोरिक अॅसिड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. तोडणीसाठी तयार, न कुजलेल्या फळांची काढणी करावी. ती तात्काळ विक्रीसाठी पाठवावीत. चिरलेली, नुकसानग्रस्त, कुजलेली फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत.
विश्रांती अवस्थेतील बागसर्वनुकसानग्रस्त, तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटाव्यात. बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांना, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. विश्रांती अवस्थेत खत व्यवस्थापन केले नसल्यास खतांचा डोस देऊन घ्यावा. शिफारशी प्रमाणे विश्रांती अवस्थेतील एकात्मिक रोग-कीड व्यवस्थापन करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी
Web Summary : Manage damaged pomegranate orchards after hailstorms by pruning, fertilizing, and spraying. Remove affected fruits and branches. Prepare for the next season or allow the orchard to rest. Protect remaining fruits with boric acid spray for sale.
Web Summary : ओलावृष्टि के बाद क्षतिग्रस्त अनार के बागों को छंटाई, उर्वरक और छिड़काव द्वारा प्रबंधित करें। प्रभावित फलों और शाखाओं को हटा दें। अगले मौसम की तैयारी करें या बाग को आराम करने दें। बिक्री के लिए शेष फलों को बोरिक एसिड स्प्रे से सुरक्षित रखें।