Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unhal Bajari : उन्हाळ बाजरी - कणसावरील फुलोरा पूर्णपणे खाऊन टाकणाऱ्या किडीचा असा करा बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 20:35 IST

Unhal Bajari : उन्हाळी हंगामात योग्य व्यवस्थापन केल्यास या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. 

Unhal Bajari : उन्हाळी बाजरी सद्यस्थितीत फुलोरा अवस्था /दाणे भरणे ते परिपक्वता अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. या पिकावर प्रामुख्याने खोडकिडा, कोंब माशी आणि कणीस पोखरणारी अळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उन्हाळी हंगामात योग्य व्यवस्थापन केल्यास या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. 

उन्हाळ बाजरीवरील कीड नियंत्रण 

  • पीक फुलोऱ्यावर असताना हिरवट सोनेरी रंगाचा सोंड असलेला किडा (सोसे/ हिंगे) फुलोऱ्यात आलेल्या कणसावर हमखास दिसून येतो. 
  • तो कणसावरील फुलोरा पूर्णपणे खाऊन टाकतो. त्यामुळे कणसात दाणे भरण्याची क्रिया थांबते व कणसात अजिबात दाणे भरत नाहीत. 
  • याची वाढ फार झपाट्याने होऊन २ ते ३ दिवसात सर्व कणसावर पसरते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते.
  • पीक फुलोऱ्यात असताना कणसावर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच, क्लोरपायरीफॉस (१.५ डीपी) एकरी ८ किलो या प्रमाणात सकाळच्या वेळेस वारा शांत असताना धुरळणी करावी.
  • वाढते तापमान लक्ष्यात घेता दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बाजरी पिकाला पाण्याची तिसरी पाळी द्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

 

 

 

Solar Pump Yojana : सामायिक सातबारा असेल तर सोलर कृषि पंप योजनेचा लाभ मिळू शकतो का? वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Control pests eating summer pearl millet flowers for better yield.

Web Summary : Summer pearl millet faces pest attacks. Control measures include Chlorpyrifos dusting during flowering. Irrigate during grain filling, says research center Igatpuri.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी