Tractor Buying : ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा घटक बनला आहे. कारण शेतीच्या प्रत्येक कामासाठी ट्रॅक्टर आवश्यक होत चालला आहे. मग पेरणीपासून सिंचनापर्यंत, वाहतुकीपर्यंत, कापणीपर्यंत ट्रॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतो आहे.
आजकाल बाजारात ट्रॅक्टरचे अनेक मॉडेल्स दिसून येतात, मात्र योग्य ट्रॅक्टर निवडल्याने वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात, मात्र अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते, अशावेळी नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
प्रथम, तुमच्या शेतीच्या गरजा समजून घ्या.
ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची गरज लक्षात घेतली पाहिजे. जर क्षेत्र लहान असेल तर हलका आणि कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर पुरेसा असू शकतो. तथापि, मोठ्या शेतात जड अवजारे आणि ट्रॉली ओढण्यासारख्या कामांसाठी अधिक शक्तिशाली ट्रॅक्टरची आवश्यकता असते. लहान शेतकऱ्यांसाठी ३६ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेचा ट्रॅक्टर पुरेसा आहे, तर मोठ्या शेतकऱ्यांनी ४० अश्वशक्ती किंवा त्याहून अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर विचारात घ्यावा.
अश्वशक्ती आणि इंजिन क्षमतेकडे लक्ष द्या
२०-३० एचपी श्रेणी असलेले ट्रॅक्टर सामान्यतः लहान शेतांसाठी योग्य मानले जातात, मध्यम आकाराच्या शेतकऱ्यांसाठी ३५-४५ एचपी आणि ४५ एचपीपेक्षा जास्त ट्रॅक्टर हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी आणि कंत्राटी शेतीसाठी चांगले पर्याय आहेत.
पिकानुसार ट्रॅक्टर निवडा
शेतकऱ्यांनी हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक पिकासाठी एकच ट्रॅक्टर योग्य नाही. उदाहरणार्थ, २५-३५ एचपी ट्रॅक्टर शेंगदाणे आणि बाजरीसारख्या हलक्या पिकांसाठी पुरेसा आहे, तर ३५-४५ एचपी ट्रॅक्टर गहू, हरभरा आणि भात यासारख्या पिकांसाठी योग्य आहे. जर तुम्ही ऊस सारखी जड पिके मोठ्या प्रमाणात घेत असाल, तर ४५ एचपी किंवा त्याहून अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर निवडा.
इंधन क्षमता आणि मायलेज
डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, ट्रॅक्टर मायलेज हा शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख मुद्दा बनला आहे, कारण जास्त मायलेज असलेल्या ट्रॅक्टरमुळे दीर्घकाळात ऑपरेटिंग खर्च कमी होतो. म्हणून, ट्रॅक्टर खरेदी करताना, त्याची इंधन क्षमता आणि तासाचा वापर तपासा
