Join us

Swarnima Yojana : महिलांसाठी स्वर्णिमा योजना, अर्ज करा, 2 लाख रुपये मिळवा, स्वतःचा व्यवसाय सुरु करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:50 IST

Swarnima Yojana : कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे.

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिम योजनांतर्गत रूपिणी मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.

कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना आणली आहे.

कोणत्या महिलांना मिळणार कर्ज ?स्वर्णिमा योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे राबविली जाते आणि यातून मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत होते.

पात्रता आणि अटी कोणत्या?स्वर्णिमा योजने अंतर्गत मागासवर्गीय महिला उद्योजकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.महिलेचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.महिलांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

कुठे आणि कसा करायचा अर्ज?जवळील एससीए कार्यालयात भेट द्या : इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या (एससीए) कार्यालयात जाऊन 'स्वर्णिमा योजना' साठी अर्ज भरावा. अर्ज भरून माहिती द्या : अर्जामध्ये व्यवसायासाठी आवश्यक माहिती, व्यवसायाची संकल्पना आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास ती नमूद करावी.अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा : अर्ज भरल्यानंतर तो एससीए कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केले जाईल.

काय लागतात कागदपत्रे ?

  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
  •  रेशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र राखीव प्रवर्गासाठी
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

 

कोणकोणते स्वयंरोजगार सुरू करता येणार ?स्वर्णिमा योजनेंतर्गत कृषी आणि संलग्न क्रियाकलाप, लहान व्यवसाय, कारागीर आणि पारंपरिक व्यवसाय, तांत्रिक आणि व्यावसायिक ट्रेड्स, आणि परिवहन व सेवा क्षेत्र यांमध्ये स्वयंरोजगार सुरू करता येतात. 

टॅग्स :कृषी योजनाशेतीमहिलाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना