Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : उन्हाळ बाजरी, भुईमूंग परिपक्वतेच्या अवस्थेत, कधीपर्यंत काढणी कराल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 20:39 IST

Agriculture News : उन्हाळ बाजरी आणि उन्हाळी भुईमूंग पिकाच्या सध्याच्या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

Agriculture News : सध्या उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वतेच्या अवस्थेत आहे, तर उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था

  • वाढते तापमान लक्ष्यात घेता दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बाजरी पिकाला पाण्याची तिसरी पाळी द्यावी. 
  • उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळुवार होते. 
  • त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १० ते १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते. 
  • बाजरीचे कणीस हाताने दाबले असता त्यातून दाणे सुटणे. 
  • तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास, पिक कापणीस योग्य आहे असे समजावे. 
  • ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करावीत व वाळवून मळणी करावी.

 

उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत

  • वाढते तापमान लक्ष्यात घेता शेंगा भरन्याच्या अवस्थेत भुईमुग पिकाला पाणी द्यावे.
  • भुईमूग शेंगा जमिनीत असल्याने त्यांची पक्वता ओळखणे थोडे कठीण काम आहे. 
  • भुईमुगाच्या प्रकारानुसार पक्वता कालावधी वेगवेगळा असतो. 
  • भुईमुग पीक काढणीयोग्य तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. पाने गळणे सुरू होते. 
  • शेंगाचे टरफल टणक बनते व टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागल्यास पिकाची काढणीकरून भुईमुगाच्या शेंगा चांगल्या वाळवून साठवणूक करावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Summer Bajra, Groundnut Maturity: Harvest Timing and Care Tips

Web Summary : Summer bajra needs watering during grain filling stage. Harvest when grains separate easily. Groundnut harvest is indicated by yellowing leaves and hardened shells. Proper drying is crucial for storage.
टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेतीशेतकरी