Soybean Crop Protection : सोयाबीनपीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून घ्या. (Soybean Crop Protection)
सोयाबीनपीक हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, पीक पिकत असताना अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. (Soybean Crop Protection)
यात खोडमाशी आणि चक्रीभुंगा या दोन प्रमुख किडींचा समावेश होतो. या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते. (Soybean Crop Protection)
खोडमाशी व्यवस्थापन
खोडमाशी ही किड झाडाच्या खोडाला आतून पोखरून टाकते. त्यामुळे झाडाची ताकद कमी होते आणि उत्पादन घटते.
नियंत्रणासाठी शिफारस
५ टक्के निम्बोळी अर्काची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
१० ते १५ टक्के झाडांवर प्रादुर्भाव दिसल्यास कीटकनाशक फवारणी करावी.
प्रमुख कीटकनाशके आणि प्रमाण (१० लिटर पाण्यासाठी)
कीटकनाशकाचे नाव | प्रमाण |
---|---|
क्लोरअँट्रानिलिप्रोल १८.५% एससी | ३ मिली |
ईथिऑन ५०% ईसी | ३० मिली |
लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.९% सीएस | ६ मिली |
थायोमिथोक्साम १२.६% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी | २.५ मिली |
क्लोरअँट्रानिलिप्रोल ९.३% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.६% झेडसी | ४ मिली |
चक्रीभुंगा व्यवस्थापन
चक्रीभुंगा ही किड पानांवर गोलाकार खाण करून हिरवळ नष्ट करते. त्यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते.
नियंत्रणासाठी शिफारस
५ टक्के निम्बोळी अर्काची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
३ ते ५ झाडांवर प्रादुर्भाव दिसल्यास कीटकनाशक फवारणी करावी.
प्रमुख कीटकनाशके आणि प्रमाण (१० लिटर पाण्यासाठी)
कीटकनाशकाचे नाव | प्रमाण |
---|---|
प्रोफेनोफॉस | २० मिली |
ईथिऑन ५०% ईसी | ३० मिली |
क्लोरअँट्रानिलिप्रोल १८.५% एससी | ३ मिली |
टेट्रानिलिप्रोल १८.५% एससी | ५ मिली |
इमामेक्टिन बेंझोएट ५% एससी | ८.५ मिली |
बीटा-सायफ्लुथ्रिन २.४% + इमिडाक्लोप्रिड १९.८% ओडी | ७ मिली |
ऑस्टीनप्राईड ९% + बायफेंथ्रीन २५% डब्ल्यूजी | ४ ग्रॅम |
थायमिथोक्साम १२.६% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी | २.५ मिली |
क्लोरअँट्रानिलिप्रोल ९.३% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.६% झेडसी | ४ मिली |
महत्त्वाच्या टिप्स
* सर्व फवारणी करताना शेतमाल सुरक्षिततेचे नियम पाळावेत.
* हातमोजे, चष्मा व मास्क वापरावा.
* कीटकनाशकाच्या शिफारस केलेल्या प्रमाणातच वापर करावा.
* एका हंगामात एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळावा.
(सौजन्य : पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)