Join us

Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी 'या' उपाययोजनांचा अवलंब करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:13 IST

Soybean Crop Protection : विदर्भातील सोयाबीन पिकावर सततचा पाऊस आणि दमट हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पाणी साचल्यामुळे झाडे पिवळसर होत असून, मुळकुज, करपा, रायझोक्टोनिया ब्लाइटसह पिवळा मोझॅक या रोगांचा धोका निर्माण होतो. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी व प्रतिबंधात्मक उपाय करून पिकाचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. (Soybean Crop Protection)

Soybean Crop Protection : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि दमट हवामानामुळे सोयाबीन पिकावर विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून, पिकाचे संरक्षण करण्यासाठी फवारणीवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.(Soybean Crop Protection)

हवामानाचा पिकावर परिणाम

ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याने पिकाची वाढ मंदावली होती.

मात्र, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाला दिलासा मिळाला.

तरीही, शेतात पाणी साचल्यामुळे झाड पिवळसर पडून अशक्त होत आहे.

या अवस्थेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

पुढील काही दिवसांत तापमान ३२-३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहिल्यास पिकावर जमिनीमार्गे होणारे बुरशीजन्य रोग अधिक प्रमाणात दिसू शकतात.

रोगांचा वाढता धोका

मुळकुज (Charcoal Rot) – सप्टेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव संभवतो.

रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट – सतत पाऊस व दमट हवामानामुळे धोका वाढतो.

करपा रोग – पाणथळ परिस्थितीत झपाट्याने पसरणारा रोग.

पिवळा मोझॅक – हवामान प्रतिकूल असल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

शेतात साचलेले पाणी निचरा करावा.

०:५२:३४ विद्राव्य खताची १% फवारणी (१ किलो खत १०० लिटर पाण्यात) करावी.

पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे.

हवामान अनुकूल होताच प्रतिबंधात्मक बुरशीनाशक फवारणी करावी.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रोगांवर योग्य औषधोपचार करावेत.

उपाययोजना (तज्ज्ञांची शिफारस)

रायझोक्टोनिया एरियल ब्लाइटसाठी 

पायरोक्लोस्ट्रोबीन (१ ग्रॅम/लिटर पाणी)

फ्लुकसापायरोऑक्साइड + पायरोक्लोस्ट्रोबीन (०.६० मिली/लिटर पाणी)

पायरोक्लोस्ट्रोबीन + इपॉक्सी कोनाझोल (१.५ मिली/लिटर पाणी)

करपा रोगासाठी 

टेबुकोनाझोल + सल्फर (२.५ ग्रॅम/लिटर पाणी)

कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (२ ग्रॅम/लिटर पाणी)

टेबुकोनाझोल (१.२५ मिली/लिटर पाणी)

कृषी तज्ज्ञांचा सल्ला

पश्चिम विदर्भात सध्या सोयाबीनपीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. याच काळात मुळकुज, करपा, रायझोक्टोनिया ब्लाइट आणि पिवळा मोझॅक या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.- प्रा. राजीव धावडे, सोयाबीन रोगशास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Protection : कापसाचे बोंड वाळतायत; कीड नियंत्रण हाच पर्याय वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन