Solar Pump Scheme : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जिल्ह्यासाठी 'गेम चेंजर' ठरणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील १०० टक्के आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांचे वीजबिल माफ करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य (अनुदान) दिले जाते. ही योजना प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते.
सौर पंप योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:अनुदान : या योजनेतून सोलर पंप (सौर ऊर्जा संच) बसवण्यासाठी ५० हजार अनुदान मिळते, जे वीज जोडणी आकार व पारंपारिक पंप संचाच्या बदल्यात दिले जाते. पात्रता : अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकरी, ज्यांच्याकडे स्वतःची विहीर/शेततळे आहे. इतर घटक : नवीन विहीर (४ लाख), जुनी विहीर दुरुस्ती (१ लाख), आणि शेततळे अस्तरीकरण (२ लाख) यांसारख्या इतर सुविधाही योजनेत समाविष्ट आहेत. अर्ज प्रक्रिया : महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो, आणि नंतर कागदपत्रे संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतात. महत्त्वाचे : जर लाभार्थ्याला महावितरणकडून सोलर पंप मंजूर झाला असेल, तर या योजनेअंतर्गत अनुदानाच्या मर्यादेत ५० हजार रुपये महावितरणकडे भरले जातात
'पहिले येणाऱ्यास प्राधान्य' शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेताना आता नशिबावर अवलंबून राहावे लागणार नाही. कृषी योजनांमधील 'लॉटरी पद्धत' आता बंद करण्यात आली आहे. याऐवजी 'पहिले येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाईल. सिंचन सुविधेसाठी विहिरी, पंप आणि ठिबक सिंचनाचा विस्तार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : Tribal farmers in Maharashtra can now get 100% subsidy on solar pumps under the Birsa Munda Krishi Kranti Yojana. Farmers can apply online through MahaDBT portal and submit documents to the agriculture officer. First come, first served!
Web Summary : महाराष्ट्र में आदिवासी किसानों को बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना के तहत सोलर पंप पर 100% सब्सिडी मिल सकती है। किसान महाडीबीटी पोर्टल के माध्यम से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं और कृषि अधिकारी को दस्तावेज जमा कर सकते हैं। पहले आओ, पहले पाओ!