Join us
Daily Top 2Weekly Top 5

Solar Pump Yojana : सामायिक सातबारा असेल तर सोलर कृषि पंप योजनेचा लाभ मिळू शकतो का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:40 IST

Solar Pump Yojana : राज्यातील हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो का? 

Solar Pump Yojana : ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. राज्यातील हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो का? 

तर होय, सामायिक सातबारा असल्यास देखील तुम्ही मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र, यासाठी काही अटी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

सामायिक सातबारासाठी आवश्यक अटी व प्रक्रिया : 

  • ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) : जर जमीन सामायिक (भागाची) असेल, तर तुम्हाला इतर सर्व खातेदारांचे/भागीदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) द्यावे लागेल.
  • प्रतिज्ञापत्र : हे NOC २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रासह सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात काही कायदेशीर वाद निर्माण होऊ नयेत.
  • पाण्याचा स्रोत : तुमच्या नावावर किंवा सामायिक सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेल किंवा नदी/नदीकाठचा पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्रक्रिया : महाराष्ट्र शासनाच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत महावितरणच्या (MSEDCL) वेबसाईटवर www.mahadiscom.in ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला इतर भागीदारांची NOC कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 

 

थोडक्यात सांगायचे तर : सामायिक जमीन असेल तरीही, इतर भागीदारांची संमती असल्यास तुम्हाला सोलर पंप मिळू शकतो.

 

आई किंवा वडिलांनी दुसरे लग्न केल्यास सावत्र मुलांना मालमत्तेत हक्क मिळतो का? वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती