Join us
Daily Top 2Weekly Top 5

Solar Panel : सोलार पॅनलपासून शॉक लागून खरंच मृत्यू होतो का, सिस्टीम चालू असताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:20 IST

Solar Panel Pump : काही दिवसांपूर्वी सोलर सुरु असताना एका शेतकऱ्याला करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

Solar Panel Pump :  सोलर पंप सिस्टीम चालू असताना (दिवसा), सूर्यकिरणांपासून सौर पॅनेल (Solar Panels) विद्युत ऊर्जा निर्मिती करतात, जिचे रूपांतर इन्व्हर्टरद्वारे विजेमध्ये होते. ही वीज घरासाठी किंवा कृषी पंपासाठी वापरली जाते. काही दिवसांपूर्वी सोलर सुरु असताना एका शेतकऱ्याला करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

सोलर पॅनेल सूर्यप्रकाशात थेट करंट (DC) तयार करत असल्याने, ओल्या हाताने किंवा खराब वायरला स्पर्श केल्यास शॉक लागू शकतो. हे टाळण्यासाठी दिवसा साफसफाई करू नका, इन्सुलेशन तपासा, आणि अर्थिंग योग्य असल्याची खात्री करा. सोलर सिस्टीममध्ये दिवसा वीज निर्मिती सुरू असते, त्यामुळे ती नेहमी धोकादायक मानून हाताळावी. 

करंट लागण्याची मुख्य कारणे आणि उपाय :

 

 

  • दिवसा साफसफाई : सोलर पॅनेल दिवसा (सूर्यप्रकाश असताना) खूप जास्त वीज (Voltage) तयार करतात. त्यामुळे पॅनेल साफ करताना किंवा ओल्या कपड्याने पुसताना करंट लागण्याचा धोका असतो.
  • उपाय : पॅनेल नेहमी पहाटे किंवा संध्याकाळी, सूर्यप्रकाश नसताना साफ करा.
  • दोषपूर्ण केबल्स (Damaged Wires) : ऊन, वारा आणि पावसामुळे पॅनेलची वायर उघडी पडली असेल, तर करंट लागू शकतो.
  • वायरवर कुठेही कट किंवा घर्षण नाही ना, याची वेळोवेळी तपासणी करा. खराब वायर तत्काळ बदला.
  • अर्थिंग (Earthing) चा अभाव : जर तुमच्या सोलर सिस्टमला योग्य अर्थिंग नसेल, तर धातूच्या फ्रेममध्ये करंट येऊ शकतो.
  • उपाय : सोलर प्लेट्सच्या सपोर्टिंग स्ट्रक्चरला (Metal Frame) अर्थिंग जोडलेले असल्याची खात्री करा.
  • ओली जमीन किंवा हात : ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून सोलरच्या भागांना स्पर्श करणे टाळा. 
  • सुरक्षितता टिप्स :सोलर पॅनेल किंवा वायरला हाताळताना नेहमी रबरी हातमोजे (Insulated Gloves) वापरा.दोन सोलर पॅनेल जोडून जास्त व्होल्टेज तयार होत असल्याने, ते धोकादायक असू शकते.सिस्टमची नियमित देखभाल (Maintenance) करा. 

 

साफ करताना देखील काळजी सौर कृषीपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सुर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सुर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डीसी उर्जा निर्माण होऊन सौर कृषीपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौर कृषीपंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते. साधारणत: सौर पॅनल वर कचरा किंवा धुळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. सौर पॅनलवरील धुळ वेळोवेळी व ओल्या कापडाद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते.

 

Solar Panel : सोलर पॅनलवर धूळ बसली, घाईघाईत स्वच्छ करू नका, पहिल्यांदा हे काम करा!

English
हिंदी सारांश
Web Title : Solar Panel Dangers: Avoid Electric Shock, Safety Tips and Solutions

Web Summary : Solar panels generate electricity even when cleaning. Avoid touching damaged wires or cleaning during the day. Ensure proper earthing to prevent shocks. Use insulated gloves and schedule regular maintenance for safety. Clean panels at dawn or dusk.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरी