Join us

Bhumi Abhilekh : सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 20:36 IST

Bhumi Abhilekh : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात.

Bhumi Abhilekh : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. यातील काही सेवा मोफत आहेत तर काही सेवांना शुल्क आकारले जाते.

यामध्ये सातबारा उतारा (Satbara) असेल 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी यासह सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा (Online Service) उपलब्ध आहेत. आता भूमि अभिलेखची नवीन वेबसाईट उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला नेमकं काय काय पाहता येणार आहे. जाणून घेऊयात या सविस्तर लेखातून...

  • https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx ही वेबसाईटची लिंक आहे. 
  • ही वेबसाईट फ्री असून यात गाव नमुना नंबर, सातबारा,  8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक या प्रकारची माहिती पाहू शकता. 
  • सातबारा पाहण्यासाठी प्रॉपर्टीचा यूआयडी नंबर असेल तर यूआयडी नंबर, मोबाईल नंबर टाकून सगळी माहिती पाहता येईल. 
  • प्रॉपर्टी युआयडी नंबर नसेल तर नाही करून तुम्ही खालील माहितीवर क्लिक करून पाहू शकता. 
  • यात पहिल्या क्रमांकावर सातबारा, दुसरा 8 अ, तिसरा मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड पत्र तर अशा प्रकारची माहिती पाहता येईल. 
  • समजा सातबारा पाहायचा आहे तर सातबारावर क्लिक करा. 
  • जिल्हा निवडा, तालुका निवडा, तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा. 
  • गट नंबर टाकून सर्च करा. मोबाईल नंबर टाकून, भाषा निवडून कॅप्चा कोड टाकावा. 
  • यानंतर तुम्हाला सातबारा पाहायला भेटेल. 
  • अशाच पद्धतीने इतरही कागदपत्रांची प्रक्रिया करता येईल . 

 

  • त्यानंतर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ही दुसरी एक वेबसाईट आहे, या ठिकाणी शुल्क आकारले जाते. 
  • या वेबसाईटवर अनेक ऑनलाईन सेवा आहेत, जसे की सातबारा उतारा पाहणे, 8 अ, मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी काही शुल्क आकारले जाते. 
  • यामध्ये आपल्याला सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार प्रत, मालमत्ता पत्रक, सातबारा फेरफारसाठी अर्ज, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती, इत्यादींसह इतरही बाबी आपल्याला तपासता येतात. 
  • मालमत्ता फेरफार सुद्धा तुम्ही करू शकता. 
  • अशा पद्धतीने एक फ्री सेवा देणारी आणि दुसरी शुल्क आकारणारी अशा दोन स्वतंत्र वेबसाईट सध्या कार्यरत आहेत. 
टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी