Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिकांसाठी मीठ चांगले असते का आणि कोणत्या पिकात वापर करायचा असतो, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 20:35 IST

Salt for Crops : मिठाचा वापर काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, ते पाहुयात.

Salt for Crops :    पिकात मिठाचा वापर तणनाशक म्हणून किंवा दुष्काळात आर्द्रता टिकवण्यासाठी केला जातो, पण याचे दुष्परिणामही आहेत; मिठाचा वापर काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, ते पाहुयात... 

  • मीठ (सोडीयम क्लोराईड ) हे एक पीक अन्नद्रव्य म्हणून वापरू शकतो. 
  • परंतु मीठ (सोडीयम  Na) हे वनस्पती आवक्षक अन्नद्रव्य (Essential Nutrient ) नाही तर मिठ (Nacl) हे functional / Beneficial अन्नद्रव्य आहे. 
  • त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात (0.058 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून) पोटॅशियम कमी असलेल्या जमिनीत मिठाचा वापर काही ठरविक पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापनात करता येतो. 
  • अशा जमिनीत सोडीयम (Na) काही प्रमाणात पोटॅशियमची कार्य पारपाडतो.

 कोणत्या पिकात मिठाचा वापर करता येतो?क्षार प्रिय किंवा क्षार सहनशील पीके : शुगर बिट गाजर, नारळ, कोको, ऑलीव्ह, निलगिरी, शतावरी, ब्रोकोली, पालक तसेच ज्वारी, बाजरी व इतर मिलेट या पिकात कार्बनडायओक्सईड चे शोषण  व पायरुव्हेट वहाना करीत सोडीयम ची गरज असते.

- डॉ. अरुण भाऊराव कांबळे, माजी प्राध्यापक, कृषी विद्या, कृषी महाविद्यालय, पुणे

English
हिंदी सारांश
Web Title : Salt for Crops: Benefits, Usage, and Expert Advice

Web Summary : Salt can act as a nutrient and retain moisture, but use carefully. Experts recommend it in small amounts for specific crops like sugar beets and millets on potassium-deficient soils, aiding carbon dioxide absorption.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी