Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहण्यासाठी फळकाढणी कधी आणि कशी करायची, वाचा सविस्तर 

द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहण्यासाठी फळकाढणी कधी आणि कशी करायची, वाचा सविस्तर 

Latest news Read in detail when and how to harvest grapes to ensure their quality. | द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहण्यासाठी फळकाढणी कधी आणि कशी करायची, वाचा सविस्तर 

द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहण्यासाठी फळकाढणी कधी आणि कशी करायची, वाचा सविस्तर 

Draksh Kadhani : यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. द्राक्ष काढणी वेगात सुरु आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते.

Draksh Kadhani : यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. द्राक्ष काढणी वेगात सुरु आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते.

Draksh Kadhani : यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. तरी देखील शेतकरी मोठ्या मेहनतीने द्राक्ष काढणी करीत आहेत. द्राक्ष काढणी वेगात सुरु आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. द्राक्ष - फळकाढणीची तयारी नेमकी कशी करायची, हे समजून घेऊयात... 

फळकाढणीची तयारी

  • वाढत्या तापमानात फळकाढणी करणे म्हणजे मण्याची प्रत बिघडविणे होय. 
  • काढणीनंतर द्राक्षाची निर्यात किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन करताना द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहणे अत्यंत आवश्यक असते. द्राक्षमण्यातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेली अवस्था म्हणजेच 'फळकाढणीचा कालावधी' होय. 
  • ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल. 
  • यावेळी मण्यातून पाणी निघून जाण्याची शक्यता कमी असते. 
  • द्राक्ष फळांची प्रत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने द्राक्षघडाची हाताळणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. 
  • फळकाढणी करताना हातमोजांचा वापर, द्राक्षघड क्रेटमध्ये एकामेकांवर पडणार नाहीत अशा प्रकारे ठेवणे म्हणजेच फळांची हाताळणी होय. 
  • घडाच्या मण्यावर कोणतीही इजा होऊ नये, याकरिता क्रेटच्या तळामध्ये कुशनिंग करणे गरजेचे आहे. 
  • कुशनिंगकरिता बबलशीटचा वापर करावा. फळकाढणी झाल्यानंतर त्वरित द्राक्षघड सावलीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • फळ काढणीच्या एक ते दोन दिवस आधी घडातील सुकलेले मणी, तडे गेलेले मणी, करप्याचे डाग असलेले मणी काढून घ्यावेत. 
  • जेणेकरून फळकाढणीच्या वेळी चांगल्या प्रतिची द्राक्ष उपलब्ध होतील.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : अंगूर की कटाई: गुणवत्ता बनाए रखने के लिए समय और तकनीक

Web Summary : गुणवत्ता बनाए रखने के लिए ठंडे तापमान में अंगूर की कटाई करें। दस्ताने और कुशन वाले क्रेट का उपयोग करके अंगूरों को सावधानीपूर्वक संभालें। उच्च गुणवत्ता वाले उत्पादन सुनिश्चित करने के लिए कटाई से पहले खराब अंगूरों को हटा दें। त्वरित छायांकन आवश्यक है।

Web Title : Grape Harvesting: Timing and Techniques for Maintaining Grape Quality

Web Summary : Harvest grapes during cooler temperatures to preserve quality. Handle grapes carefully, using gloves and cushioned crates. Remove damaged grapes before harvesting, ensuring high-quality produce. Quick shading is essential.