Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rabbi Maka Perani : रब्बी मका पेरणी कधीपर्यंत आणि कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:44 IST

Rabbi Maka Perani : रब्बी हंगामातील मका लागवड खरीप हंगामापेक्षा अधिक फायदेशीर असू शकते.

Rabbi Maka Perani :  रब्बी हंगामातीलमकापेरणीसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करणे आवश्यक असते. रब्बी हंगामातीलमका लागवड खरीप हंगामापेक्षा अधिक फायदेशीर असू शकते आणि त्यासाठी योग्य नियोजन, जसे की खत व्यवस्थापन आणि योग्य वाणांची निवड, करणे आवश्यक असते. 

रब्बी मका पिकाची पेरणी

  • पाण्याची उपलब्धता असल्यावरच रब्बी मका पिकाची पेरणी करावी. 
  • रब्बी हंगामात मका पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी. 
  • पेरणीसाठी एकरी ६ ते ८ किलो बियाणे लागते. 
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम आणि सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८%) + थायमिथोक्झाम (१९.८% एफएस) हे संयुक्त कीटकनाशक ६ मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
  • रासायनिक बीजप्रकियेनंतर, अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • रब्बी हंगामात सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. 
  • उशिरा व मध्यम कालावधीच्या जातींसाठी ७५ x २० सें.मी. तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें. मी. अंतरावर सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Rabbi Maize Sowing: Timing and Method Explained in Detail

Web Summary : Sow Rabbi maize by the second week of November for optimal results. Proper planning, fertilizer management, and variety selection are crucial. Use 6-8 kg seeds per acre, treat with fungicide and insecticide, and consider ridge and furrow method with appropriate spacing for best yields.
टॅग्स :मकापीक व्यवस्थापनपेरणीरब्बी हंगाम