Join us

Rabbi Maka Crop : मका पिकात पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे कशी कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 20:30 IST

Rabbi Maka Crop : रब्बी मका पिकात पेरणीनंतर महत्त्वाच्या आंतरमशागतीचे कामे (Rabbi Maka Crop Management) करावीत.

Rabbi Maka Crop : रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्वाचे पीक असलेल्या मका पिकाची पेरणी (Maize Sowing) सुरु आहे. रब्बी मका पिकात पेरणीनंतर पक्षी राखण, नांग्या भरणे/ विरळणी करणे तसेच तणनियंत्रण/भर देणे ई. महत्त्वाच्या आंतरमशागतीचे कामे (Rabbi Maka Crop Management) करावीत. या लेखाद्वारे संबधित कामांबाबत थोडक्यात पाहुयात....

मका आंतर मशागत : पेरणी नंतर घ्यावयाची काळजी

अ. पक्षी राखण

खरीप हंगामात पेरणी नंतर उगवण ५-६ दिवसात तर रब्बी हंगामात ८ ते १० दिवसात होते. पिक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते, म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत व पिक दुधाळ असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात अशावेळी पक्ष्यांपासून राखण करणे महत्वाचे.

ब. नांग्या भरणे

उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकाच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. गरज भासल्यास पिक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.

क. तणनियंत्रण / भर देणे

तणनियंत्रणासाठी अँट्राझीन ५०% हेक्टरी २ ते २.५ किलो पेरणी संपताच ५०० लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारावे.

- ग्रामीण मौसम कृषी सेवा, विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

हेही वाचा : Maka Lagwad : मका पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणते वाण निवडाल? वाचा सविस्तर 

टॅग्स :मकापीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती