Join us

Onion Diseases : कांदा रोपवाटिकेत मर रोग कशामुळे? नियंत्रणासाठी हे उपाय करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 14:16 IST

Onion Diseases : कांदा रोपवाटिकेतील मर रोग (Onion Diseases) नियंत्रणात आणण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील 

Onion Diseases : सद्यस्थितीत रब्बी कांदा लागवड (Rabbi Kanda Lagvad) सुरु झालेली असुन ब-याच शेतक-यांचे कांदा रोपे ही ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यातील सततच्या पावसामुळे मर व करपा रोगाच्या प्रार्दुभावामुळे रोपवाटीकेत (Kanda Ropvatika) खराब झालयामुळे रोपाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कांदा रोपवाटिकेतील मर रोग (Onion Diseases) नियंत्रणात आणण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील. 

कांद्यावरील रोपवाटीकेतील मर रोग

  • कांदा पिकाच्या रोपवाटीकेतील रोपांवर मर रोग हा पयुजॅरियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. 
  • खरीप हंगामातील हवामान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते. 
  • रोपवाटीकेत या रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसतात. 
  • त्याचप्रमाणे जमिनीतील बुरशीमुळे लागवडीनंतरही प्रादुर्भाव होवून मर किंवा सड होते. 

 

उपाययोजना  

  • कांद्याच्या रोपवाटीकेसाठी जमीन उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी. 
  • रोपे तयार करतांना गादी वाप-यावरच करावीत. 
  • बियाणे निरोगी, स्वच्छ व खात्रीचे असावे.
  • रोपवाटीकेत पेरणी करण्यापुर्वी कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडूर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रकिया करावी. 
  • बियाणे पुरणीपुर्वी 3 X 1 मी. आकाराच्या गादी वाफ्यावर कॉपर ऑक्झीक्लोराईड 30 ग्रॅम प्रती वाफा या प्रमाणात मिसळावे. 
  • तसेच पेरणीनंतर 15 दिवसांनी पुन्हा 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मधोमध आतावे. लगेच वाफ्याला पोहोच पाणी द्यावे. लागवडीकरिता जमीन उत्तम निचरा होणारी व मध्यम प्रतीची असावी.

 

- - डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, कांदा, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती