Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > हलक्या, मध्यम अन् भारी जमिनीसाठी ज्वारीचे कुठले वाण बेस्ट राहील, वाचा सविस्तर 

हलक्या, मध्यम अन् भारी जमिनीसाठी ज्वारीचे कुठले वाण बेस्ट राहील, वाचा सविस्तर 

Latest news Rabbi Jwari Variety these variety of sorghum best for light, medium and heavy soils, read in detail | हलक्या, मध्यम अन् भारी जमिनीसाठी ज्वारीचे कुठले वाण बेस्ट राहील, वाचा सविस्तर 

हलक्या, मध्यम अन् भारी जमिनीसाठी ज्वारीचे कुठले वाण बेस्ट राहील, वाचा सविस्तर 

Rabbi Jwari Variety : ज्वारी पेरणी करत असाल तर तुमच्या जमिनीनुसार नेमक्या कोणत्या वाणांची लागवड करावी.

Rabbi Jwari Variety : ज्वारी पेरणी करत असाल तर तुमच्या जमिनीनुसार नेमक्या कोणत्या वाणांची लागवड करावी.

Rabbi Jwari Variety :   रब्बी हंगामात तुम्ही जर ज्वारी पेरणी करत असाल तर तुमच्या जमिनीनुसार नेमक्या कोणत्या वाणांची लागवड करावी. पेरणी करतांना काय काय काळजी घ्यावी, या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

जमिनीनुसार ज्वारीचे वाण निवडा 

  • हलक्या जमिनीसाठी (खोली ३० सेमी) - फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माउली
  • मध्यम जमीन (खोली ३०-६० सेमी) - फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउली, परभणी मोती
  • भारी जमीन (खोली ६० सेमी पेक्षा जास्त) - फुले वसुधा, फुले यशोदा (एस.पी.व्ही.-१३५९), परभणी मोती (एस.पी.व्ही.-१४११)

 

पेरणीपूर्वीची काळजी 

  • ज्वारीची पेरणी पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी. 
  • ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरुरीचे आहे. 
  • त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. 
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावे. 
  • बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. 
  • जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. 
  • पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest news Rabbi Jwari Variety these variety of sorghum best for light, medium and heavy soils, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.