Join us
Daily Top 2Weekly Top 5

Grape Cracking Issue : द्राक्षांच्या मण्यांवर देठाजवळ क्रॅकिंग होण्याची शक्यता, 'ही' फवारणी करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:35 IST

Grape Cracking Issue : काही ठिकाणी पाऊस झाला असल्याने काळ्या द्राक्षांच्या मण्यांवर देठाजवळ क्रॅकिंग होण्याची शक्यता असते.

Grape Cracking Issue : काही भागात सध्या काळ्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. पाऊस झाल्यास काळ्या द्राक्षांच्या मण्यांवर देठाजवळ क्रॅकिंग होण्याची शक्यता असते. पावसाचे पाणी वेलींच्या मुळांजवळ साचल्यास मुळे जास्त पाणी शोषून घेतात. वातावरणामध्ये जास्त सापेक्ष आर्द्रता वाढलेली असल्यामुळे पानांद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन नेहमीपेक्षा कमी होते. 

साहजिकच मुळांनी शोषून घेतलेले पाणी मण्याकडे ओढले जाते. पाण्याचा दाब वाढल्यामुळे मण्याला तडा जातो. काळ्या जातीमध्ये काढणीआधीच तडा जाईल याची खात्री नसते.

काढणीनंतर बॉक्सेसमध्ये घड बंद केल्यानंतर आतील आर्द्रता वाढते. बॉक्समध्ये मण्यांना तडा जातो. त्यातून रस बाहेर येतो. त्यावर बुरशी वाढून सर्व घड कुजण्याची शक्यता असते.

उपाययोजना

  • पाऊस पडल्यानंतर दुपारच्या वेळेस चांगले ऊन पडून बागेत बऱ्यापैकी वारे वाहत असल्यास क्रॅकिंगचा धोका राहत नाही. 
  • बागेतील जमीन काळी व पाणी धरून ठेवणारी असल्यास पाऊस येण्याचे लक्षण दिसल्यास बागेत हलके पाणी द्यावे. 
  • हलका पाऊस झाल्यास मुळाजवळील जमीन पाण्याने पूर्णपणे संपृक्त होईल इतपत पाणी द्यावे. 
  • त्यामुळे मुळे पाणी शोषून घेणे थांबवतील. 
  • पाऊस आणि ढगाळ वातावरण जाईपर्यंत मुळाच्या परिसरातील पाणी कमी होऊ न दिल्यास क्रॅकिंगचा धोका कमी होईल. 
  • हलक्या जमिनीत हा उपाय मदत करणार नाही.
  • घड ओला असताना काढू नये. 
  • बागेत बऱ्यापैकी सूर्यप्रकाश असताना आणि घडावरील दव, पावसाचे किंवा फवारणीचे पाणी संपूर्ण सुकलेले असतानाच घडाची काढणी करावी.
  • क्रॅकिंगचा धोका जास्त वाटल्यास घडांवर कायटोसॅन ३ मिली अधिक ट्रायकोडर्मा २.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Grape Cracking Solution: Prevent cracking in black grapes with this spray.

Web Summary : Black grape cracking near the stem is possible due to rain. Manage soil moisture, harvest dry grapes, and spray chitosan with Trichoderma to prevent cracking and rot.
टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनपाऊसशेती