Vegetable Farmning : अनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळू लागले आहेत. भाजीपाला शेतीतून कमी दिवसांत चांगलं उत्पन्न मिळत असते. आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे. भाजीपाला लागवडीसाठी नोव्हेंबर महिना महत्वाचा मानला जातो. या महिन्यात नेमक्या कोणत्या भाज्यांची लागवड करावी, ज्या कमी दिवसांत चांगलं उत्पन्न देतील, ते पाहुयात...
गाजराची शेती हिवाळ्यात गाजरांना खूप मागणी असते. ते मिश्र भाज्या, सॅलड, ज्यूससाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. लागवडीसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ भारतीय हवामानासाठी आदर्श आहे. बियाणे १/४ ते १/२ इंच खोलीवर पेरावे आणि रोपांमध्ये १.५ ते २ इंच अंतर ठेवावे. दुहेरी ओळीच्या प्रत्येक फुटावर १४ ते १८ रोपांची लागवड करावी. गाजरे साधारणपणे ९०-१०० दिवसांत काढणीसाठी तयार होतात, पण हे जातीनुसार बदलू शकते.
बीटाची शेती बीट ही हिवाळ्यातील एक लोकप्रिय भाजी आहे. ती सॅलड किंवा ज्यूस म्हणून वापरली जाते. बीटाच्या लागवडीसाठी गाळाची, पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली जमीन उत्तम असते. चांगल्या प्रतीचे बीट बियाणे निवडा. बीटचे बियाणे अनेक दाण्यांच्या समूहांमध्ये येते. बियाणे थेट जमिनीत पेरा. लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरा आणि कंपोस्ट खत मिसळा. लागवडीनंतर साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत पीक काढणीसाठी तयार होते.
ब्रोकोली शेती रब्बी हंगाम ब्रोकोली लागवड करण्यासाठी चांगला काळ आहे. लागवडीची प्रक्रिया इतर कोबी जातींसारखीच आहे. रोपांची लागवड करताना दोन ओळींमध्ये सुमारे ३६ इंच आणि रोपांमध्ये १८ ते २४ इंच अंतर ठेवा. लागवड केल्यानंतर पहिल्या आठवड्यात भरपूर पाणी द्या. लागवडीनंतर सुमारे 70 ते 100 दिवसांनी ब्रोकोली कापणीसाठी तयार होते.
मुळा शेती मुळा सॅलड आणि इतर अनेक अन्नपदार्थांमध्ये वापरला जातो. त्याचे असंख्य पौष्टिक गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला मुळा लागवड करायची असेल तर बियाणे लागवड पद्धतीने करता येते. योग्य व्यस्थापनानंतर ४० ते ५५ दिवसात पीक काढणीसाठी तयार होते. मुळा आणि त्याच्या पानांची स्वतंत्रपणे विक्री करता येते. कमी खर्चात आणि कमी वेळात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.
Web Summary : Rabi season is ideal for planting vegetables like carrots, beetroot, broccoli, and radish. These crops mature quickly, offering good returns within 40-100 days with proper management. They are suitable for salads, juices, and various dishes.
Web Summary : रबी सीजन गाजर, चुकंदर, ब्रोकोली और मूली जैसी सब्जियां लगाने के लिए आदर्श है। ये फसलें जल्दी परिपक्व होती हैं, उचित प्रबंधन के साथ 40-100 दिनों के भीतर अच्छा रिटर्न देती हैं। ये सलाद, जूस और विभिन्न व्यंजनों के लिए उपयुक्त हैं।