Join us
Daily Top 2Weekly Top 5

सद्यस्थितीत भात पिकात किती पाणी असू द्यावे, कसे करावे व्यवस्थापन? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:04 IST

Paddy Farming : अशावेळी भात पिकात किती पाणी असू द्यावे व अन्य काय उपाययोजना कराव्यात हे समजून घेऊयात... 

Paddy Farming :  राज्यातील काही भागात भात पिकाची लागवड (Paddy farming) होऊन पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आहेत. काही भागात जास्त दिवसांचे पीक झाले आहे. तसेच सद्यस्थितीत काही भागात पाऊस सुरु आहे. अशावेळी भात पिकात किती पाणी असू द्यावे व अन्य काय उपाययोजना कराव्यात हे समजून घेऊयात... 

  • जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतो कि भात पिकातील जास्तीचे पाणी काढून टाकावे.
  • सद्यस्थितीत भात पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरेंट्रानिलिप्रोले १८.५ एस.पी. ३.० मी.ली. किंवा फ्लुबेंडियामाइड ३९.३५ एस.सी. १.० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • भात शेतीमध्ये पुनर्लागवडीनंतर दोन ते तीन बेनण्या (खुरपणी) कराव्या. 
  • भात खाचरात ५ ते ६ सेमी पाणी साठवून उत्कृष्ठपणे तण नियंत्रण करता येते.
  • पुनर्लागवड केलेल्या भात पिकात ३ दिवसांनी युरिया डी.ए.पी. गोळ्या ७० किलो प्रती एकर याप्रमाणत वापरून अन्नद्रव्याचे नुकसान टाळावे.
  • भाताची नवीन लागवड केलेल्या भात खाचरात पुनर्लागवड केलेली रोपे स्थिर होईपर्यंत पाण्याची पातळी १ ते २ सें.मी ठेवावी. 
  • तसेच ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे प्राथमिक अवस्थेत आहेत. तेथे २-३ सें.मी पाण्याची पातळी ठेवावी.
  • भात लागवडीनंतर रासायनिक खत देतांना निवडक व उगवणपूर्व तणनाशक पायराझोसल्फ्यूरॉन इथाईल 10% विद्राव्य पावडर (व्यापारी नाव साथी), २०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • विविध जैविक खते जशी निळे हिरवे शैवाल प्रति हेक्टरी २० किलोग्रॅम भात लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी शेतात टाकावे.
  • खेकड्यांच्या बिळांशेजारी विषारी आमिष ठेवून खेकड्यांचे नियंत्रण करता येते यासाठी एसिफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (७५ ग्रॅम) घेऊन १ कि.ग्रॅ. शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या अमिषाचे १०० लहान- लहान
  • गोळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावेत. 

(घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिनांकाचा अंदाज घेऊन त्या दिवसाकरिता स्थगित करव्यात.)

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Sugar Market : गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत साखरेचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन