Join us

Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी साडे तीन लाखांचे अनुदान, असा करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:52 IST

Mini Tractor Scheme : या योजनेतून 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा असे अर्थसहाय्य केले जाते. 

नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत (Social Welfare) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Scheme) व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी 23 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

या याजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना (Saving Groups) 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी रूपये 3 लाख 50 हजार कमाल मर्यादेत (90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा) अर्थसहाय्य केले जाते. 

अर्ज कसा करावा? 

  • सर्वप्रथम समाज कल्याण विभागाच्या https://mini.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f  या संकेतस्थळावर भेट द्या. 
  • यातील ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा. 
  • आपल्यासमोर नोंदणी करण्याचा अर्ज उपलब्ध होईल. 
  • यात सुरुवातीला बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावेच रजिस्ट्रेशन करावे अशी सूचना दिसेल. 
  • त्याखाली संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी, पासवर्ड, बचत गटाचे नाव, अर्ज करावयाचा जिल्हा ही माहिती भरावी. 
  • त्याखाली Register बटणावर क्लिक करून नोंदणी करावी.

 

ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहिती तसेच इतर अटी व शर्तींच्याअधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

Second Hand Tractor : सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' गोष्टी हमखास लक्षात ठेवा!

टॅग्स :कृषी योजनामार्केट यार्डशेती