Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत आंबा मोहोर वाळण्याची शक्यता, परागीभवन होण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:10 IST

Amba Mohor : अति थंडी व मावा-तुडतुडे यांसारख्या किडींमुळे हे परागीभवन नीट होत नाही, ज्यामुळे फळधारणा कमी होते.

Amba Mohor :    आंबा मोहराचे परागीभवन मुख्यत्वे कीटक आणि वाऱ्यामुळे होते, ज्यात मधमाश्या व इतर कीटक परागकण नर फुलांपासून मादी फुलांपर्यंत पोहोचवतात, पण अति थंडी व मावा-तुडतुडे यांसारख्या किडींमुळे हे परागीभवन नीट होत नाही, ज्यामुळे फळधारणा कमी होते. या काळात आंबा मोहोराची विशेष काळजी घ्यावी लागते. 

आंबा मोहोर नियोजन 

  • आंबा मोहोरामध्ये नर व संयुक्त फुले ओळखणे आवश्यक आहे. 
  • अति थंडीमुळे नर फुलांचे प्रमाण वाढून संयुक्त फुलांचे प्रमाण अतिशय कमी होते. 
  • तसेच थंडीमुळे परागीभवन करणारे कीटक कमी प्रमाणात आढळतात. 
  • यामुळे परागीभवन न होता आंबा मोहोर वाळताना दिसतो.
  • आंबा मोहोरातील परागीभवन वाढविण्यासाठी हाताजवळील मोहोरावरून हात फिरवावा, उंच फांदीवरील मोहोरासाठी बांबूच्या काठीला केरसुणी बांधून फिरवावी. 
  • आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा. 
  • यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी. 
  • माशाला पक्षांपासून वाचविण्यासाठी रिकाम्या बाटलीचा तळ काढून बुचातून तार घालून आत माशाचा काही भागात लटकत ठेवावा. 
  • या लटकवलेल्या माशाचा वास पसरावा, म्हणून बाटलीला झरोके निर्माण करावेत. 
  • यामुळे परागीभवन करणारे कीटक विशेष करून माशा आकर्षित होऊन आंब्यामध्ये परागीभवन होताना आढळते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Protect Mango Blossoms from Cold: Pollination Tips for Fruit Set

Web Summary : Cold weather threatens mango blossoms. Promote pollination by hand, attract insects with dried fish, and protect from birds. This ensures better fruit production.
टॅग्स :फलोत्पादनआंबाफळेशेतीपीक व्यवस्थापन