Join us

Maize Crop : मागील वर्षी मका पिकावर मर रोग आला, यंदा येऊ नये, म्हणून काय कराल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:11 IST

Maize Crop : यावर्षी खरीप हंगामात (Kharif Season) शेतकऱ्यांनी मका पीकावरील (Maize Crop Disease) मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

नाशिक : खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सर्वसाधारणपणे 2.70 लाख हेक्टर क्षेत्रावर मका पीक लागवड प्रस्तावित आहे. गतवर्षी मका पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी खरीप हंगामात (Kharif Season) शेतकऱ्यांनी मका पीकावरील (Maize Crop Disease) मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक कार्यालयाचे कृषी उपसंचालक महेश वेठेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मर रोगावर खालीलप्रमाणे उपायोजना कराव्यात•    पीकांची फेरपालट करावी (मागील वर्षी ज्या क्षेत्रामध्ये रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला होता, त्या क्षेत्रामध्ये मका पीक घेणे टाळावे)•    उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. तसेच शेतीतील काडीकचरा वेचून नष्ट करावा.•    फुलोऱ्याच्या वेळी पिकास ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.•    माती परिक्षणानुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा. पेरणीच्या वेळी पोटॅश खताचा वापर करावा.•    बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा या जैवबुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रती किलो बियाणे प्रमाणात बीजप्रक्रिया करावी अथवा 4 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रती एकरी शेणखतात मिसळून द्यावे.

बीजप्रक्रियेसाठी आवश्यक ट्रायकोडर्मा खालील ठिकाणी उपलब्ध आहेत•    सहयोगी अधिष्ठता, कृषी विज्ञान संकुल, काष्ठी, ता.मालेगाव, जि.नाशिक•    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) नाशिक•    कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक•    राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF) चितेगाव, ता.निफाड, जि.नाशिक

टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनखरीप