Mahadbt Scheme : महाडीबीटी ही महाराष्ट्र शासनाचे एक ऑनलाइन योजना पोर्टल आहे. जे सरकारच्या विविध योजनांमधील लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी वापरली जाते. या पोर्टलमार्फत शेतकरी विविध योजनांसाठी अर्ज करू शकतात. यावरील योजनांसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात, हे पाहुयात...
कृषि यांत्रिकीकरण योजना
- अद्ययावत सातबारा
- ८ अ
- मंजूर यंत्र/औजाराचे कोटेशन
- मान्यता प्राप्त संस्थेचा वैध तपासणी अहवाल
- ट्रॅक्टर चलित औजारासाठी आरसी बुक
- प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण
- विहित नमुन्यातील हमीपत्र ३
- सातबारा
- ८ अ
- वैध जात प्रमा णपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
कांदा चाळ
- सातबारा
- ८ अ
- DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
- सातबारावर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
प्लास्टिक मल्चिंग
- सातबारा
- ८ अ
- सातबारावर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
- चतुःसीमा नकाशा
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
हरितगृह / शेडनेटगृह
- सातबारा
- ८ अ
- विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
- विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
- चतुःसीमा नकाशा
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
ठिबक / तुषार / PVC पाईप
- सातबारा
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19)
- सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
- मंजूर घटकाचे कोटेशन
पंपसंच (ISI/BEE labeled with Minimum 4 Star rated)
- सातबारा
- ८ अ
- मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
- सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
भाजीपाला रोपवाटिका
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
- स्थळदर्शक नकाशा
- चतुःसीमा
- विहित नमुन्यातील हमीपत्र
- वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
महत्वाचे : महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी कागदपत्रांसोबत फार्मर आयडी क्रमांक (अनिवार्य) करण्यात आला आहे.