Sprinkler Drip List : महाडीबीटीच्या माध्यमातून अनेक सोडती काढण्यात आल्या असून तुषार सिंचनची सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये मात्र कमी शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या शेतकऱ्यांची यादी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृषी विभागातील विविध योजनांसाठी महाडीबीटीवर अर्ज केले जातात. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येतो. यांनतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. अशा शेतकऱ्यांची यादी प्रसिंद्ध करण्यात येते. यांनतर दिवसांच्या आत संबंधित पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या प्रक्रियेनंतर पुढील प्रक्रिया पार पडते.
या यादीमध्ये लातूर, सांगली, बुलढाणा, वर्धा, सोलापूर, यवतमाळ, भंडारा, बीड, पुणे, परभणी, पालघर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, धुळे, धाराशिव, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया, अहिल्यानगर, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या योजनेची यादी महाडीबीटीवर पोर्टल जाऊन पाहता येईल.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर आपण कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरुवातीला आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी केल्यानंतर आपण विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
MahaDBT Lottery List : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण सोडत आली, अशी पहा जिल्हानिहाय यादी