Join us

Mahadbt Lottery List : महाडीबीटीवर फळबाग लागवड योजनेची निवड यादी आली, तुमचं नाव चेक करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:55 IST

Mahadbt Lottery List : अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbt Lottery List) जाऊन जिल्हा निहाय यादी आवाहन करण्यात आले आहे. 

Mahadbt Lottery List : महाडीबीटी पोर्टलवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची (Falbag Lagvad Yojana) निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbt Lottery List) जाऊन जिल्हा निहाय यादी आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी अर्ज करीत आहेत. यामध्ये आंबा, लिंबू, चिकू, नारळ, चिंच, आवळा, पेरू, संत्री, मोसंबी, जांभूळ इत्यादी फळ पिकांसाठी लाभ घेता येतो. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नोंदणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडत असते. 

त्या अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर सदर योजनेची सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत निवड यादी जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर निवड झाल्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. 

इथे पाहता येईल यादी 

अशी असते प्रक्रिया आता ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्याबाबतचा मॅसेज देखील पाठवण्यात येईल. त्यानुसार कागदपत्रे अपलोड करण्याकरता सात दिवसांची मुदत देण्यात येते.

जर काही कारणास्तव मुदतीत कागदपत्रे अपलोड न झाल्यास पुन्हा मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून आणखी तीन दिवसाची मुदत देण्यात येते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MahaDBT Lottery List : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण सोडत आली, अशी पहा जिल्हानिहाय यादी

टॅग्स :कृषी योजनाशेतीफळेशेती क्षेत्र