Join us

PM Kisan Aadhar : पीएम किसानमध्ये तुमचे नाव आधारपेक्षा वेगळे आहे का? लगेच हे काम करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:23 IST

PM Kisan Aadhar : तुमचा पीएम किसानचा २० वा हप्ता अडकू शकतो. जर तुम्हालाही ही अडचण असेल तर हे काम लवकर करा.

PM Kisan Aadhar :  जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (Pm Kisan Scheme) लाभार्थी आहात, अशात तुमचे नाव पीएम किसान आणि आधार कार्डमध्ये वेगळे आहे, तर तुम्हाला पुढील हफ्ता मिळण्यासाठी अडचणीचे ठरू शकते. तुमचा पीएम किसानचा २० वा हप्ता अडकू शकतो. जर तुम्हालाही ही अडचण असेल तर हे काम लवकर करा.

पीएम किसानचा २० वा हप्ता (PM Kisan 20th Installment) जूनमध्ये येईल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु आतापर्यंत पीएम किसानचा २० वा हप्ता अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. त्याच वेळी, अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे.

ही चूक कशी दुरुस्त करावीजर तुमचे पीएम-किसान नाव आधारशी जुळत नसेल, तर तुम्ही घरी बसून हे काम सहजपणे करू शकता. एक ऑनलाईन पद्धतीने तर दुसरी ऑफलाईन. 

ऑनलाइन पद्धत

  • सर्वप्रथम https://pmkisan.gov.in वर जा
  • ‘शेतकरी कॉर्नर’ या पर्यायासमोरील ‘स्वयं-नोंदणीकृत शेतकऱ्याचे अपडेट’ वर क्लिक करा
  • तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा एंटर करा आणि योग्य पर्याय निवडा
  • आधारवर दिसत असलेल्या नावाप्रमाणेच तुमचे नाव जुळवा आणि सबमिट करा

ऑफलाइन पद्धत

  • खालील माहितीसह तुमच्या जवळच्या CSC (सामायिक सेवा केंद्र) किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जा:
  • आधार कार्ड
  • जमीन नोंदी
  • बँक पासबुक
  • पीएम-किसान (फार्मर) आयडी (उपलब्ध असल्यास)

अशा पद्धतीने आधार आणि पीएम किसान योजनेतून नाव करेक्ट करता येणार आहे. 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेतीशेती क्षेत्र