Join us

krushi salla : खरीप पिकांसाठी तज्ज्ञांनी काय दिलाय सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:06 IST

krushi salla : खरीप पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिलाय कृषी सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla)

krushi salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल होणार आहेत. बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Krushi Salla)

काही ठिकाणी मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काय करावे हा सल्ला दिला आहे.(Krushi Salla)

हवामानाचा अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार २६ जुलैपर्यंत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना व मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत ३० ते ४० किमी/तास वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे.

२५ जुलै – नांदेड, परभणी, हिंगोली, जालना: हलका ते मध्यम पाऊस

२६ जुलै – बीड, जालना, परभणी: वादळी वाऱ्यासह पाऊस

कमाल तापमानात ३-४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता, किमान तापमानात विशेष फरक नाही.

पिकनिहाय सल्ला

सोयाबीन

सध्या अंकुरण/प्रारंभिक वाढीची अवस्था आहे.

पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची सोय करावी.

वादळी वाऱ्यांमुळे रोपं आडवी पडल्यास ती लगेच सरळ करावीत.

पानांवर डाग/कोवळ्या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

पाऊस व वीज कोसळण्याचा इशारा असल्याने फवारणी टाळावी.

कापूस

जमिनीत वापसा असेल तर अंतरमशागती करून तण नियंत्रण करावे.

रसशोषक किडींसाठी

निंबोळी अर्क ५ टक्के किंवा

ॲसिटामॅप्रिड २ ग्रॅम/ १० लिटर किंवा

फ्लोनिकॅमिड ५०% ६० ग्रॅम/एकर

वरखत

कोरडवाहू: ३५ किलो नत्र/हेक्टरी

बागायती: ५२ किलो नत्र/हेक्टरी

४५ दिवस झाल्यास: २०० ग्रॅम युरिया प्रति १० लिटर फवारणी

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर पसरावा.

तूर

शेतात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या.

तण नियंत्रणासाठी अंतरमशागत करा.

गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर पसरवा.

मुग / उडीद

पाण्याचा निचरा करा.

मावा किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी.

अंतरमशागती करा, गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड वापरा.

भुईमूग

पाण्याचा निचरा महत्त्वाचा आहे

तण नियंत्रणासाठी मशागत करा.

गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर.

मका

लष्करी अळीसाठी

इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के – ४ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा

स्पिनेटोरम ११.७% SC – ४ मि.ली/१० लिटर

फवारणी पोंग्यात योग्यरीत्या करा.

पेरणीनंतर ३० दिवसांनी ७५ किलो नत्र/हेक्टरी वरखत द्यावी.

ऊस

पांढरी माशी नियंत्रणासाठी 

जैविक: लिकॅनीसिलियम लिकॅनी – ४० ग्रॅम प्रति १० लि.

रासायनिक: क्लोरोपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड, ॲसीफेट (योग्य मात्रेत)

पोक्का बोइंग रोगासाठी:

कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% WP – ५० ग्रॅम/१० लिटर

कॉपर ऑक्सीक्लोराईड – २० ग्रॅम/१० लिटर

फळबाग व्यवस्थापन

केळी, आंबा, द्राक्ष, सिताफळ

अतिरिक्त पाण्याचा निचरा

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड

केळी – ५० ग्रॅम युरिया/झाड

आंबा – इमिडाक्लोप्रिड ४-५ मि.ली/१० लिटर

द्राक्ष – रोगग्रस्त भाग काढून सूर्यप्रकाशासाठी फुटी काढा

सिताफळ – कार्बेन्डाझिम + कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम/१० लिटर

भाजीपाला

काढणीस तयार भाजीपाला त्वरित काढा.

रसशोषक किडींसाठी

पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% – १० मि.ली किंवा

डायमेथोएट ३०% – १३ मि.ली/१० लिटर

फुलशेती

फुलपिकांची काढणी तातडीने करा.

पाण्याचा निचरा करा.

पशुधन सल्ला

लम्पी स्किन रोग प्रतिबंध

वासरांना चिक पाजावा.

सातव्या दिवशी जंतनाशक औषध द्यावे.

शासनाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण.

आजारी व निरोगी जनावरांचे वेगळे पालन.

स्वच्छ पाणी, सकस चारा व जखमांची निगा – २०% उपचार, ८०% काळजी घेणे गरजेचे आहे

पावसाच्या सध्याच्या स्वरूपामुळे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी पेरणी न झाल्यास पुढील पीक पर्यायांचा विचार करा.

सूर्यफूल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर, बाजरी + तूर, एरंडी, कारळ, तिळ, धणे  आदी.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक,  ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : पेरणीसाठी सर्वोत्तम पिकांची निवड; तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्रमराठवाडा