Join us

Krushi Salla : पिकांची निगा, तण नियंत्रण, गोगलगायी नियंत्रणासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:11 IST

Krushi Salla : मराठवाड्यात १० ते १२ जुलैदरम्यान हलक्याच पावसाची शक्यता असून पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पेरणीयोग्य (७५–१०० मिमी) पावसाची वाट पाहावी, असे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, आधीच लागवड केलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी व गोगलगायी व किडींच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात १० ते १२ जुलैदरम्यान हलक्याच पावसाची शक्यता असून पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पेरणीयोग्य (७५–१०० मिमी) पावसाची वाट पाहावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.(Krushi Salla)

दरम्यान, आधीच लागवड केलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी व गोगलगायी व किडींच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.(Krushi Salla)

हवामानाचा अंदाज व सारांश 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार मराठवाड्यात १० जुलै रोजी काही ठिकाणी, तर ११ व १२ जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. 

११ ते १७ जुलैदरम्यान पाऊस, कमाल व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात जमिनीतील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांनी ७५-१०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.

पीक व्यवस्थापन सल्ला 

कपाशी 

उगवलेल्या कपाशी पिकात विरळणी करावी.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड (२ किलो/एकर) शेतात पसरावा.

रसशोषक किडी दिसल्यास  ५% निंबोळी अर्क, किंवा ॲसिटामॅप्रिड २०% @ २ ग्रॅम/१० लिटर पाणी

फलोनिकॅमिड ५०% @ ६० ग्रॅम/एकर फवारणी करावी.

लागवड होऊन महिनाभर झाल्यास वरखत द्यावीत

कोरडवाहू कपाशी – ३६ किलो नत्र/हेक्टर

बागायती कपाशी – ६० किलो नत्र/हेक्टर

तूर 

पेरणी झालेल्या तुरीत अंतरमशागत व तण नियंत्रण करावे.

पेरणी न झाल्यास पावसाची प्रतीक्षा करावी व बिजप्रक्रिया करून पेरणी करावी (१५ जुलैपर्यंत शक्य).

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड पसरवा.

मूग/उडीद

अंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर वापरावा.

भुईमूग 

अंतरमशागत व तण नियंत्रण करावे.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड वापरावा.

मका

उगवलेल्या मक्यात विरळणी, नांग्या भरणे व अंतरमशागत करावी.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड वापरावा.

ऊस 

पांढरी माशी आढळल्यास

जैविक उपाय : लिकॅनीसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम/१० लिटर पाणी

रासायनिक : क्लोरोपायरीफॉस २०% (३० मिली) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८% (३ मिली) किंवा ॲसीफेट ७५% (२० ग्रॅम)/१० लिटर पाणी फवारणी करावी.

इमिडाक्लोप्रिड सोबत २% युरिया मिसळून फवारणी करावी.

फळबाग व्यवस्थापन 

केळी 

लागवडीनंतर ३० दिवसांनी ५० ग्रॅम नत्र व २०० ग्रॅम स्फुरद प्रति झाड द्या.

शंखी गोगलगायीसाठी मेटाल्डिहाईड पसरवा.

आंबा

१०-१५ वर्षे वयाच्या झाडांना ५००:५००:५०० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश व ५० किलो शेणखत प्रति झाड द्या.

द्राक्ष 

रोगट पाने काढा, बगल फुटी काढा, वेलींना बांधणी द्या.

मेटाल्डिहाईड वापरून शंखी गोगलगायीचे नियंत्रण करा.

सिताफळ 

तण नियंत्रण करा व मेटाल्डिहाईड पसरवा.

भाजीपाला व फुलशेती 

* गादीवाफा/लागवड केलेल्या पिकांची पुर्नलागवड जमिनीत ओलावा पाहून करावी.

* बी लावणाऱ्या भाज्यांची (भेंडी, कारले, भोपळा आदी.) लागवड करावी.

* काढणीस तयार पिकांची काढणी घ्या.

* मेटाल्डिहाईड वापरून शंखी गोगलगायी नियंत्रण करा.

पशुधन व्यवस्थापन 

* गोठा स्वच्छ, कोरडा ठेवा.

* पाणी साचू देऊ नका, दर १५ दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने निर्जंतुकीकरण करा.

* माश्या, डास कमी ठेवण्यासाठी खबरदारी घ्या.

सूचना : पावसाचा जोर लक्षात घेऊन कामे वेळेत पूर्ण करा. पेरणीयोग्य पाऊस (७५–१०० मिमी) न झाल्यास थांबा.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Farmer Jugaad : नवा मार्ग, नवा जुगाड; सूर्यवंशी बंधूंनी दुचाकीवर केली आंतरमशागत वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडातुरातूरसोयाबीनकापूस