Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोबीवरील असा रोग ज्यामध्ये गड्डा किंवा कोबी तयार होत नाही, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:23 IST

Kobi Lagvad : ज्यामध्ये रोपाच्या मध्यवर्ती भागातील वाढ खुंटते किंवा शेंडा तुटतो, ज्यामुळे गड्डा किंवा कोबी तयार होत नाही.

Kobi Lagvad :   कोबीवर्गीय पिकांमधील (फुलकोबी, कोबी) 'ब्लाइंडनेस' किंवा वांझ रोप ही एक शारीरिक विकृती आहे, ज्यामध्ये रोपाच्या मध्यवर्ती भागातील वाढ खुंटते किंवा शेंडा तुटतो, ज्यामुळे गड्डा किंवा कोबी तयार होत नाही. या रोगाची आणखी काय कारणे आहे, त्यावर उपाय काय हे पाहुयात... 

कोबीवर्गीय पिके ब्लाइंडनेस (वांझ रोप)ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात.

उपाययोजना

  • लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत.
  • रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी.
  • कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमानात करावे.
  • वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

 

 Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Cabbage Blindness: No Head Formation. Causes and Solutions Explained.

Web Summary : Cabbage blindness, hindering head formation, affects cabbage family crops. It's caused by stunted growth or damage to the central part of the plant. Prevention includes using healthy seedlings, careful handling during transplanting, avoiding low temperatures, and removing affected plants. These measures ensures healthy yields and prevents crop loss.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी