Khol Nangrat : बदलते वातावरण तसेच वेगवेगळ्या पीकपद्धती, अति रासायनिक खताचा वापर, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वेगवेगळ्या सिंचन पद्धती, पारंपारिक शेतीपद्धती व यांत्रिकारणाचे परिणाम या सर्वांचा मातीवर (Soil Plough) परिणाम होत आहे. जमिनीमध्ये टणक, कठीण थर निर्माण होत आहे. यावर खोल नांगरट हा उत्तम पर्याय आहे.
खोल नांगरट म्हणजे काय ?जमिनीच्या पृष्ठभागाखालील निर्माण झालेला घट्ट थर फोडला जातो. जमीन सैल केली जाते व जमीन भूसभूशीत होते. साधारण जमिनीच्या प्रकारानुसार हि खोल नांगरट २ ते २.५ फूटापर्यंत केली जाते.
खोल नांगरटीचे फायदे
- खोल नांगरेटीमुळे जमिनीतील तयार झालेला कडक थर फोडला जातो
- खोल नांगरटीच्या माध्यमातून म्हणजेच Subsoiling मुळे जमिनी व पाण्याचे संवर्धन होते.
- पिकांना सहजपणे आणि सुलभतेने अन्नद्रव्ये जमिनीतून घेता येतात.
- पाण्याचे शोषण जमिनीत जास्त प्रमाणात होते.
- पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
- पिकांची वाढ चांगली होते व उत्पन्नात वाढ होते.
- पावसामुळे पिकाचे नुकसान होत नाही. पिक पाण्यात न राहता पिकांचे सडणे टाळले जाते.
- पाणी जमिनीवर साचून न राहता व्यवस्थित मुरले जाते.
- खोल नांगरट दोन ते तीन वर्षातून एकदा केली तरी चालते त्यामुळे जमिनीचे संवर्धन तर होतेच सोबतच पैशांची व वेळेची ही बचत होते.
खोल नांगरट कशाने करावी ?खोल नांगरटीसाठी एक ट्रॅक्टर चलीत मशीन उपलब्ध आहे. त्या मशीनचे नाव सबसॉईलर हे आहे. ही मशीन जमिनीमधील कडक थर फोडण्याचे व जमिन भुसभुशीत करण्याचे काम करते.
खोल नांगरटीची उत्तम वेळखोल नांगरट ही दोन ते तीन वर्षातून एकदा करावी व नोव्हेंबर ते मे महिन्यामध्ये खोल नांगरट केल्यास चांगले परिणाम मिळतात.
- डॉ. प्रियंका राजकुमार खोले, विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी